व्यावसायिकांच्या प्रश्‍नांवर भाजपा व्यापारी आघाडी आक्रमक 

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी शशिकांत शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.कार्यकारिणीची घोषणा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणा झाली.
व्यावसायिकांच्या प्रश्‍नांवर भाजपा व्यापारी आघाडी आक्रमक 

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी शशिकांत शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीची घोषणा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणा झाली. व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांच्या समस्या, प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्ष कटिबध्द असून त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. या प्रश्‍नांसाठी आवश्‍यकता भासल्यास आंदोलन केले जाईल, असे श्री. शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 

पक्षाच्या प्रदेश सरचिणीस आमदार देवयानी फरांदे, प्रदेश सदस्य, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, महापौर सतिष कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, राष्ट्रीय परिषद सदस्य मयुर सराफ यांच्या उपस्थितीत भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कार्यकारिणीतील पदाधिकारी असे, अध्यक्ष श्री. शेट्टी, उपाध्यक्ष : सागर आडगांवकर, मंगेश पगार, परेश बोगाणी, निलेश बाफना, दिपक चौधरी, शरद निकम, सरचिटणीस : सुरज राठी, प्रतिक नांदुर्डीकर, गौतम हिरन, चिटणीस : रवी जैन, गणेश अष्टेकर, प्रशांत राका, राजेश लोढा, राजेश नंदवानी, विजय कुकरेजा, सदस्य : अनिल सोनावणे, समीर वडनेरकर, श्‍याम लीलारमानी, उमेश राठोड, नितीन देशपांडे, राजेंद्र कासट, गोपाळ खरोटे, सचिन घोडके, गोविंद शर्मा, निलेश शर्मा, प्रमोद चोकसी, आमोद सहाने यांचा समावेष आहे. 

यावेळी श्री शेट्टी म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणामुळे व्यापारी व्यावसायिक अडचणीत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु असताना शासनाने कोणतेही दिलासादायक निर्णय घेतलेले नाहीत. नुकतेच वीजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. हे दर अन्याय्य आहे. कोरोनामुळे व्यावसाय बंद आहेत. उद्योगांना अडचणी आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा स्थितीत मोठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. तेव्हा खरे तर आर्थिक दिलासा देण्याची गरज आहे. मात्र राज्य शासनाने कोणताही दिलासा न देता वीजेची बीले वाढीव दराने दिली आहेत. त्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. मात्र अद्याप सरकरा काहीही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. व्यापारी वर्गाला हा दिलासा न मिळाल्यास व्यापारी आघाडीतर्फे महावितरण व राज्य सरकार विरोधात आंदोलन करेल. 

यावेळी आमदार राहुल ढिकले, वसंत गिते, सुनिल बागुल, महेश हिरे, सुहास फरांदे, विजय साने, सरचिटणीस पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील, प्रदिप पेशकार, आशिष नहार, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, हेमंत गायकवाड, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, सुनिल देसाई, अविनाश पाटील, शिवाजी बरके, अमोल इघे आदी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 
...  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com