नाशिकला १.१७ लाख कोरोनामुक्त; ३ हजारांवर उपचार सुरू

शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तीन हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरात विविध स्तरावर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
corona news
corona news

नाशिक : शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तीन हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरात विविध स्तरावर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. प्रशासन सजग झाल्याने नागरिकांत दक्षता बाळगण्याचा संदेश देण्यात आला आहे.  

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ लाख २२ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १७ हजार ५५५  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक ९६, चांदवड २५, सिन्नर ८४, दिंडोरी ५१, निफाड १३०, देवळा १४, नांदगांव ११२, येवला ३९, त्र्यंबकेश्वर २०, सुरगाणा ०८, पेठ ००, कळवण १७,  बागलाण ३१, इगतपुरी २३, मालेगांव ग्रामीण ४३ असे एकूण ६९३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २२८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९६  तर जिल्ह्याबाहेरील ३३ असे एकूण ३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख २२  हजार ८१०  रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९५.७३ टक्के, नाशिक शहरात ९५.९५ टक्के, मालेगाव मध्ये  ९२.६२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.०२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.७२ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात ८३२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एक हजार ३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७७  तसेच जिल्ह्याबाहेरील ५७ अशा दोन हजार १०५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com