नरहरी झिरवळांनी जिल्हा बॅंकेला खडसावले, शेतकऱ्यांना कर्ज द्या! - Narhari Zirwal said, sanction crop loan to farmers, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नरहरी झिरवळांनी जिल्हा बॅंकेला खडसावले, शेतकऱ्यांना कर्ज द्या!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषीकर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी कृषीकर्जापासून वंचित आहेत. विविध सोसायट्यांच्या अनिष्ट तफावत कमी करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला केले. 

नाशिक : जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषीकर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी कृषीकर्जापासून वंचित आहेत. (Farmers are deprived from crop loan) विविध सोसायट्यांच्या अनिष्ट तफावत कमी करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, (Bank shall start crop loan to farmers) असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Aseembly vice president Narhari Zirwal) यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला केले. 

मुंबई विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या कर्जवाटप, वसुली व टीडीएस कपात आदी अडचणींबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे खासगी सचिव संतोष पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी श्री. झिरवाळ बोलत होते. 

बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाबूशेठ बागमार, जिल्हा बँकेचे प्रशासक एम. ए. अरिफ, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, विधानसभा उपाध्यक्ष सचिव मुकेश भोगे, आंबे दिंडोरीचे उपसरपंच सुभाष वाघ, राजेंद्र परदेशी, गोपाळ धूम आदी उपस्थित होते. 
या वेळी सचिव पाटील यांनी बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध उपाय सुचवत प्रशासकांनी त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या द्याव्यात, असे सांगितले. 

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकेने एवढ्या अडचणींच्या काळातही अनेक सोसायट्यांमधील अनिष्ट तफावत दूर होत सोसायट्यांचे कर्जवाटप सुरू झाले आहे. ‘ब’ वर्गातील काही सोसायट्यांची अनिष्ट तफावत दूर झाली. तसाच प्रयत्न ‘क’ वर्गासाठी करावा व जास्तीत जास्त कर्जवाटप करावे, असे आवाहन करण्यात आले. 

या वेळी जिल्हा बँक संचालक गणपत पाटील, माजी आमदार जयंत जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेतकरी बाबूशेठ बागमार यांनी विविध सूचना मांडल्या. प्रशासक आरिफ व मुख्य कार्यकारी संचालक पिंगळे यांनी या सर्व सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले. याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या प्रशासकीय सूचना करत अडचणींवर मार्ग काढण्यात येईल, असे संतोष पाटील यांनी सांगितले. 
...

हेही वाचा...

आदिवासी संशोधन, प्रशिक्षण व शिक्षण संस्था नाशिकला हलवा...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख