उपसभापती झिरवाळ यांनी निवेदन घेतले, पण बोलले नाही - Narhari Zirwal recived memorandum, doesn`t give any coment, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

उपसभापती झिरवाळ यांनी निवेदन घेतले, पण बोलले नाही

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

राज्य शासनाने ५० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक दिंडीतील एका वारकरी प्रतिनिधीना वारीसाठी परवानगी मिळावी. वारीशी संबध नसलेल्यांची दिंडीत घुसखोरी होउ नये, असे निवेदन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारीतील दिंडी क्रमांक पाचतर्फे देण्यात आले आहे.

नाशिक : राज्य शासनाने ५० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. (Government given permission for 50 Varkari) त्यामुळे प्रत्येक दिंडीतील एका वारकरी प्रतिनिधीना वारीसाठी परवानगी मिळावी. (one representitive shall allowed of Each Dindi) वारीशी संबध नसलेल्यांची दिंडीत घुसखोरी होउ नये, असे निवेदन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारीतील दिंडी क्रमांक (Memorandum given to Narhari Zirwal) पाचतर्फे देण्यात आले आहे.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना वारकऱ्यांतर्फे ह.भ.प. बाळासाहेब महाराज काकड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यात, कोरोना महामारीमुळे पायी वाऱ्यांची परवानगी बंद करण्यात आली आहे. मागील वर्षी शासनाने २० वारकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पंढरपुरला जाण्याची परवागनी दिली. त्यानुसार राज्यातील मानाच्या दहा पालख्या विविध भागातून एसटी बसने रवाना झाल्या. शासनाचा आदेश शिरसावंद्य मानून वारकरी बांधवानी कुठलाही आतीतायीपणा केला नाही. मात्र यंदाही शासनाने ५० भाविकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे वारकरी समूहाचा भ्रमनिरास झाला आहे. शासनाच्या या निर्णयाला वारकरी, किर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, भालदार, चोपदार,महिला वारकरी अशा सगळ्यांचा विरोध आहे.

प्रत्येक दिंडीला हवे स्थान
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी जुनी पालखी आहे. त्यात, ३८ नोंदणीकृत दिंड्या सहभागी होतात. वर्षानुवर्ष हजारो वारकरी पायी जातात. त्यामुळे यंदा ५० वारकरी निवडतांना प्रत्येक दिंडीतील एकेक वारकरी घेतला जावा. त्यात वारीशी संबध नसलेल्यांनाची घुसखोरी होउ नये अशी मागणी करीत बाळासाहेब काकड, लक्ष्मीचंद शेंडे, चेतन महाराज नागरे, वारकरी सेवा समितीचे अमर ठोंबरे आदीनी निवेदन दिले.

वारकरी आणि वारी यांचे अतूट नाते आहे. वारकरी आणि विठूरायाचे अतूट नाते आहे. शासनाने प्रातनिधीक स्वरुपात ५० वारकऱ्यांना वारीची परवानगी दिली आहे. त्यामुळे निवृत्तीनाथांच्या ३० ते ४० दिंड्यातील प्रत्येक एकेका वारकरी याप्रमाणे ५० लोकांना परवानगी दिली जावी. त्यात वारीशी संबधित नसलेल्यांची घुसखोरी नको.
-ह.भ.प बाळासाहेब महाराज काकड (दिंडी प्रमुख ५ मखमलाबाद परिसर)
...

हेही वाचा...

एकनाथ खडसे म्हणतात, `पायी वारी व्हायला हवी होती`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख