विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नाचले...त्याला 45 हजारांनी दिली दाद!

नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचाऑनलाइन विवाह झाला. यावेळी त्यांनी वाजंत्रीवर मस्त ठेका धरला. तो थोड्या नाही तर चक्क 45 हजार जणांनी याची देही, याची डोळा पाहिला अन् भरभरुन दाद दिली.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नाचले...त्याला 45 हजारांनी दिली दाद!

नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे मुळातच कलाकार आहेत. त्यात आनंदाचा क्षण असेल, सगळ्यांचे प्रोत्साहन असेल अन् सोबतील वाजंत्रीची धून असेल तर त्यांनी ठेका धरला नाही तरच नवल. मंगळवारीही असेल झाले. निमित्त होते, त्यांच्या मुलाचा ऑनलाइन विवाह. यावेळी त्यांनी वाजंत्रीवर मस्त ठेका धरला. तो थोड्या नाही तर चक्क 45 हजार जणांनी याची देही, याची डोळा पाहिला अन् भरभरुन दाद दिली. 

या लग्नाच्या कार्यक्रमात मंगल वाद्य असलेली वाजंत्री होतीच. वाजंत्री सुरु झाल्यावर श्री. झिरवाळ यांनी त्यावर ठेका धरला नसता तरच नवल. यावेळी श्री. झिरवाळ मस्त नाचले. पै पाहुण्यांनी त्याचा पुरेपूर आनंद घेतला. अनेकांनी ओवाळणी टाकली. मुळात श्री. झिरवाळ हे लहानपणापासून कलाकार म्हणून विविध नाट्यांत काम करीत आले आहे. त्यांच्या कुटुंबाचे स्वतःचे मंडळ होते. त्यात ते विविध गावांत जाऊन रात्रीचे जागरण- गोंधळ व आदिवासी कार्यक्रम करीत. त्यात श्री. झिरवाळ अनेक पात्रांची भूमिका करीत असत. त्यामुळे हजरजबाबी आणि विनोदी स्वभाव याची त्यांना जोड मिळाल्याने एरव्ही साध्या संवादातही ते रस भरतात. त्यांचा अनुभव मुलाच्या लग्नात त्यांच्या नृत्याने अनेकांनी घेतला.   

राजकीय नेत्यांच्या मुलांच लग्न म्हटले की शाही विवाह सोहळा असा दृढ समज आहे. मात्र यंदा कोरोनाने ही सर्व समिकरणे बदलून टाकली. तसेच विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ यांच्या विवाहात झाले. गोकुळ याचा विवाह करंजाळी (दिंडोरी) येथील पद्माकर गवळी यांची कन्या जयमाला हिच्याशी कंरजाळी येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झाला. कोरोनाने या सोहळ्यांवर गंडांतर आणले. त्यामुळे अनेक वेळा हे लग्न पुढे ढकलले गेले होते. मात्र आता प्रतिक्षा न करात विवाह उरकून टाकावा असा मतप्रवाह आला. त्यामुळे हा विवाह मंगळवारी झाला. श्री.  झिरवाळ यांनीं मुलाचे लग्न अत्यंत साधेपणाने अवघे चाळीस जणांच्या उपस्थितीत करुन साधेपणा जपला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नासाठी कुणाही नेत्यांना व जनतेला प्रत्यक्ष लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले नाही  मात्र सोशल माध्यमात लग्नसोहळा ऑनलाइन करुन सर्वांना शुभेच्छा देण्याचे आवाहन त्यांनी केले. हा विवाह फेसबुक लाईव्ह द्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे आदींसह सुमारे तीस हजार नागरिकांनी ऑनलाइन त्यात भाग घेऊन शुभेच्छा दिल्या. पंचेचाळीस हजार नागीरकांनी या नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले.


 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=uvwupo9gaLUAX9hge7O&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=163b13da4e265415a2a91c5417e4c416&oe=5F2128A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com