नरहरी झिरवाळांच्या रुपाने मतदारसंघात विकासाची गंगा - Narhari Zirwal brings the Devolopment Flow in Dindori, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नरहरी झिरवाळांच्या रुपाने मतदारसंघात विकासाची गंगा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 जून 2021

दिंडोरी - पेठ मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे पाहता येत्या काही दिवसांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा दिसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य अविनाश जाधव केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.

दिंडोरी : दिंडोरी - पेठ मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे पाहता (Lots of Devolopment works is on in Dindori-Peth Constituency) येत्या काही दिवसांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा (In Future Devolopment Ganga will appear) दिसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य अविनाश जाधव केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice president Narhari Zirwal) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. जाधव म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून मंजूर केलेल्या काही वळण योजना पूर्ण झाल्या असून, काही पूर्णत्वाकडे आहेत. ज्यावेळी ह्या योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण होतील, तेव्हा दिंडोरीचे खरोखर मोठे नंदनवन पाहायला मिळेल. वाड्या - पाड्यांवर वसलेल्या दिंडोरी व पेठ तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक करताना नक्कीच मोठ्या अडचणी येतात. मात्र, आता ना. नरहरी झिरवाळ राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्यामुळे अधिकच निधी विकासकामांना मिळेल व त्याचा फायदा दिंडोरी - पेठ मतदारसंघाला होईल.

ते म्हणाले, मध्यंतरीच्या काळात स्वतः ना. झिरवाळ यांनी दिल्लीत जाऊन काही मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यालाही लवकरच यश मिळेल, असा विश्‍वास देखील श्री. जाधव यांनी व्यक्त केला.

या वेळी दिंडोरी नगरपंचायतीच्या माजी अध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, अनिकेत बोरस्ते, हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, राहुल गटकळ, गोकुळ सलादे, साहिल अत्तार, सचिन जगताप आदींसह नागरिक उपस्थित होते. 
...

हेही वाचा...

आदिवासी पट्ट्यांसाठी नरहरी झिरवाळ यांनी थेट दिल्ली गाठली...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख