केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश मानसिकतेचे! 

तीन काळ्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र असून इंग्रजांविरोधात काँग्रेसने जो लढा दिला, तोच संघर्ष इंग्रजांची मानसिकता असलेल्या मोदी सरकारविरोधात सुरु राहील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
Nana Patole
Nana Patole

जळगाव : तीन काळ्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र (center Government wants to destroy farmers Through Farmers Bill) असून इंग्रजांविरोधात काँग्रेसने जो लढा दिला, तोच संघर्ष इंग्रजांची मानसिकता असलेल्या मोदी सरकारविरोधात सुरु राहील, (Congress will fight against British mentality`s Modi Government) अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.  

जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जळगावी पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पटोले म्हणाले, गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला मोदींना वेळ नाही. इंग्रज राजवटीविरोधात देशाने जसा लढा दिला, तसाच लढा आता मोदी सरकारविरोधात द्यायची वेळ आली आहे. ‘झोळी घेऊन आलोय’ असे म्हणणाऱ्या मोदींना झोळी घेऊन सत्तेतून परत पाठवू. 

तीनही पक्षांची कामांबाबत तक्रार 
सत्तेत असून काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी आहेत, याबद्दल छेडले असता पटोले म्हणाले, सत्तेतील तीनही पक्षांच्या आमदारांची कमी- अधिक प्रमाणात ही तक्रार आहे. मात्र, त्यामागची कारणे अनेक आहेत. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटीचा १ लाख कोटींचा हिस्सा अद्याप दिला नाही. दोन्ही बजेट कोरोनामुळे प्रभावित झाल्याने राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. 

विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांचे घेण्याबद्दल त्यांनी फडणवीसांवर टीका केली. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत काही ठरवायचे आणि जाहीरपणे दुसरे बोलायचे ही भाजपची दुटप्पी भूमिका योग्य नाही, असे ते म्हणाले. 

अधिवेशन फैजपूरला 
फैजपूरला काँग्रेसच्या १९३६ मध्ये झालेल्या ग्रामीण अधिवेशनाची पार्श्वभूमी आहे. तो धागा पकडत येणाऱ्या काळात कोविड निवळल्यानंतर प्रदेशाचे तीन दिवसीय अधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात फैजपूर येथेच घेण्याची घोषणा पटोलेंनी केली. या वेळी प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शोभा बच्छाव आदी उपस्थित होते. 


मोदींनी ठरवले तर कोरोना जाईल 
पहिल्या व दुसऱ्या लाटेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून जनसेवा केली. तिसरी लाट येऊ घातली असून त्यादृष्टीने सतर्कतेचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यासाठीही कार्यकर्ते सज्ज आहेत. कोविडचा आढावा जिल्हानिहाय घेत असून त्यासंबंधी प्रशासनाला सूचना करीत आहोत, असे सांगताना मोदींनी ठरवले तर कोरोना जाईल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com