मध्यरात्रीची गर्दी पाहून पटोले म्हणाले, `तुम्ही खरे काँग्रेसचे सैनिक`

कोरोनाशी लढायचे तर वैज्ञानिक दृष्टिकोण हवा. डॅाक्टर्स, दवाखाने व वैद्यकीय सुविधा लागतात. या सर्व सुविधा गेल्या साठ वर्षातपुरोगामी व देशाच्या विकासाचे स्वप्न घेऊन काम केलेल्या काँग्रेसने देशात उभ्या केल्या. त्यामुळे कोरोनाशी लढा देता आला. आजचे सरकार तर केवळ टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यात व्यस्त आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
Nana patole nashik
Nana patole nashik

नाशिक : कोरोनाशी लढायचे तर वैज्ञानिक दृष्टिकोण हवा. (We need scintific aptitude to fight with covid19) डॅाक्टर्स, दवाखाने व वैद्यकीय सुविधा लागतात. या सर्व सुविधा गेल्या साठ वर्षात पुरोगामी व देशाच्या विकासाचे स्वप्न घेऊन काम केलेल्या काँग्रेसने देशात उभ्या केल्या. (Congress erect these medical infrastructure in last sixty years) त्यामुळे कोरोनाशी लढा देता आला. आजचे सरकार तर केवळ टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यात व्यस्त आहे, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी सांगितले.  

श्री. पटोले जळगावहून मुंबईला रवाना झाले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी द्वारका चौकात त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. मध्यरात्री एकला देखील कार्यकर्त्यांत उत्साह होता. श्री. पटोले यांचा त्यांनी सत्कार केला. ती गर्दी पाहून श्री पटोले यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, आज देशाची लोकशाही, नागरिक व संवैधानिक व्यवस्था संकटात लोटली जात आहे. त्याविरोधातील लढाई तुमच्यासारख्या मध्यरात्रीसुद्धा जागरूक राहणाऱ्यांच्या जोरावरच काँग्रेस जिकंणार आहे. तुम्ही सैनिकांपेक्षा कमी नाही. यावेळी त्यांनी शहरातील संघटनात्मक स्थितीची माहिती घेतली.  

श्री. पटोले म्हणाले, देशात कोरोनाचे संकट आहे. हे संकट थाळ्या वाजवून कमी होणार नाही. अशा पद्धतीने कोविड गेला असता तर हॉस्पिटलची गरज भासली नसती, अशी टिका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर केली. 

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात कोरोना आला आणि देशाची अर्थवव्यस्था कोलमडून टाकली आहे. आजही त्यांना कोरोनाशी मुकाबला करण्यापेक्षा निवडणूकांत जास्त रस आहे. विरोधी पक्षाच्या राज्यांत ही मंडळी प्रचंड सत्ता, संपत्ती व सबंध देशातील नेत्यांसह प्रचारात तुटून पडतात. ही निवडणूक आहे की अन्य कोणते संकट अशी स्थिती निर्माण होते. महागाई वाढून जनता त्रस्त झाली आहे. प्रत्येक जिवनाश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतकरीही त्रस्त झाला आहे. खाद्यतेल असो अथवा इंधन यांच्या किमती वाढवून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या संकटात टाकले. 

यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, बबलु खैरे, हनिफ बशीर, उद्धव पवार, स्वप्नील पाटील, गुड्डी आपा, दाऊद भाई शेख, नदीम शेख, शब्बीर पठाण, समिना पठाण यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com