मुंबई स्फोटाच्या कारस्थानासाठी घर देणारा युसूफ मेमनचा कारागृहात झाला मृत्यू

युसूफ मेमनने मुंबई स्फोटाच्याकारस्थानासाठी घर दिले.मात्र त्यानंतर आयुष्यभर स्वतःचेच काय कारागृहातही त्याला घर (खोली) मिळालीनाही. काल त्याचामृत्यू झाला, तो देखील बराकीबाहेरच.न्यायालयाबरोबर त्याला ही दुसरी शिक्षाही भोगावी लागली.
मुंबई स्फोटाच्या कारस्थानासाठी घर देणारा युसूफ मेमनचा कारागृहात झाला मृत्यू

नाशिक : मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटातील कट घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा युसूफ अब्दुल रज्जाक मेमन (वय 55) याचा नाशिक रोड कारागृहात मृत्यू झाला. त्याने या कारस्थानासाठी घर दिले होते. मात्र त्यानंतर आयुष्यभर स्वतःचेच काय कारागृहातही त्याला घर मिळाले नाही. काल झालेला मृत्यूही बराकीबाहेरच झाला. न्यायालयाबरोबरच त्याला नियतीने दिलेली ही दुसरी शिक्षाही भोगावी लागली.

पाकीस्तानच्या चिथावनीने कुख्यात अंडरवल्ड डॅान दाऊन इब्राहीम आणि टायगर मेमन यांनी घडविलेल्या मुंबई साखळी बॅाम्बस्फोटातील प्रमुख गुन्हेगार युसूफ मेमन काल येथील कारागृहात सकाळी दातांना ब्रश करताना जमिनीवर कोसळला. त्याला कारागृह कर्मचा-यांनी कारागृहातील डॅाक्टरांकडे दाखल करण्यात आले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आज त्याचे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. युसूफ मेमनला दोन वर्षांपूर्वीच या कारागृहात हलविले होते. मृत्यू संदर्भातील अधिकृत माहिती सायंकाळी कारागृह प्रशासनाने दिली. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली. 
असा होता सहभाग

असा अडकला युसूफ मेमन

मुंबई साखळी बॅाम्बस्फोटातील गुन्हेगारांना कट आखण्यासाठी युसूफने फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. टायगर मेमन याने दाऊद ईब्राहीम याच्या बरोबरीने हा कट प्रत्यक्षात आणला. या साखळी बॉंबस्फोटाचा सूत्रधार टायगर मेमन असून, तो आई-वडिलांसह माहीम येथील आठ मजली अल-हसैनी इमारतीत राहत होता. त्याच्या घरातच शक्तिशाली बॉंब बनविण्यात आले होते. याच इमारतीत बॉंस्फोटांचा कट रचण्यात आला. बॉंबस्फोटांच्या आदल्या दिवशी टायगरच्या माणसांनी तेथे आरडीएक्‍स आणून ठेवले होते. मात्र टायगर कुटुंबासह पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार कुटुंबियांसह दुबईमार्गे पाकीस्तानला गेले. युसूफ मात्र जाऊ शकला नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. युसूफ यांच्या सहभागातील तपासातून या कटातील तपासाला दिशा मिळाली. सप्टेंबर 2007 मध्ये विशेष टाडा न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. युसूफ व त्याचा भाऊ इसाक मेमन या दोघांना 2018 मध्ये मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. तेव्हापासून दोघेही कारागृहातील अंडा सेलमध्ये होते. 

जगभर हादरे देणारा स्फोट
मुंबई शहरात 12 मार्च 1993 या दिवशी 13 बॉंबस्फोट घडविण्यात आले. देशाची अर्तव्यवस्था खीळखीळी करणे, अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचा बदला घेणे हे त्याचे मोटीव्ह होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिम यांनी हे षडयंत्र घडवले. या स्फोटांत अडीचशेपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दीड हजार नागरिक जखमी झाले.  हे तिघेही अद्याप फरारी आहेत. टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमन यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात 30 जुलै 2015 ला फाशी देण्यात आली. दरम्यान, मेमन बंधूंचे आई-वडीलही या प्रकरणात आरोपी होते. त्यामुळे हे कुटुंबीय भारतात परतताच युसूफ मेमनचे वडील अब्दुल रझाक मेमन शिक्षा भोगत असताना तुरुंगात आजारी पडले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, 2001 मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मेमन बंधूंनी साखळी स्फोटासाठी लागणारे आरडीएक्‍स ज्या गाडीतून आणले, ती गाडी रुबिनाच्या नावावर असल्याने तिला दोषी ठरविण्यात आले. अशा प्रकारे  मेमन कुटूंबाला स्फोटाची शीक्षा मिळाली. 
--- 
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=xvn-kIc8ooYAX_HB5c2&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=388f3bdafab7ec79370d51f6e2bbdd35&oe=5F1D3427

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com