सरकारचा निर्णय डावलून मुक्ताई पालखीचं प्रस्थान करणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य शासनाने मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने त्वरित निर्णय बदलावा, अन्यथा सरकारचा निर्णय डावलून मुक्ताई पालखीचे प्रस्थान करणार, असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आज येथे दिला.
Tushar Bhosale
Tushar Bhosale

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य शासनाने मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने त्वरित निर्णय बदलावा, (State Govt. should change decision for 10 palkhees)  अन्यथा सरकारचा निर्णय डावलून मुक्ताई पालखीचे प्रस्थान (Otherwise Muktai Palkhee will proceed to Pandharpur) करणार, असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी आज येथे दिला.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी (ता. १२) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आषाढी वारी हे जागतिक वैभव आहे. परंतु राज्यातील आघाडी सरकारने पायी आषाढी वारीला खोडा घातला आहे. राज्य सरकारने पायी वारीला बंदी घातल्याचा निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. राज्यातील आघाडी सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. सरकारचा निर्णय धुडकावून, मुक्ताई पालखीचं प्रस्थान करू, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. पायी वारी व्हावी, ही वारकरी संप्रदायाची भावना आहे.

सरकारने तातडीने निर्णय बदलावा अन्यथा राज्यातून अनियंत्रित वाऱ्या निघतील, असा इशारा दिला. त्यानंतर भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार राहतील. पायी वारीला निर्बंधांसाहित सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने हिंदुत्वाची परंपरा मोडली आहे. मर्यादित वारकऱ्यांसह पायी वारीला परवानगी द्यावी. रस्त्यात वारी कोणत्याही गावात जाणार नाही. ज्येष्ठ नागरिक वारीत नसतील, लस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीत सहभागी होतील. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य निर्बंध घालूनच वारीला परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी त्र्यंबकेश्‍वर येथील निवृत्तिनाथ महाराज संस्थान संजय धोंडगे, आध्यात्मिक आघाडीच्या मेघना आंबेकर, माणिक देशमुख आदी उपस्थित होते.

भाजप धर्माचं राजकारण करत नाही. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारीला प्रतिनिधिक स्वरूपात पायी जाण्याची परवानगी मिळावी, हीच मागणी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. बार सुरू करण्यासाठी या सरकारचे प्रमुख पत्र लिहितात. मग वारीची परंपरा जपण्यासाठी का नाही?, असा सवाल आचार्य भोसले यांनी केला आहे. वारकरी संप्रदाय आणि सामान्य वारकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य निर्बंध घालून परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com