विंचूर गवळी त्यांचं कुटुब ; `रिकामे` दाम्पत्य गावाचे कारभारी ! - Mr & Mrs elected as sarpanch, vice sarpanch. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

विंचूर गवळी त्यांचं कुटुब ; `रिकामे` दाम्पत्य गावाचे कारभारी !

निलेश छाजेड
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

विंचूर गवळी (ता. नाशिक)  येथे शुक्रवारी सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. यावेळी सरपंचपदी त्यांच्या पत्नी अनिता विजय रिकामे तर उपसरपंचपदी विजय दत्तात्रय रिकामे यांची निवड झाली.

एकलहरे : विंचूर गवळी (ता. नाशिक)  येथे शुक्रवारी सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. यावेळी सरपंचपदी त्यांच्या पत्नी अनिता विजय रिकामे तर उपसरपंचपदी विजय दत्तात्रय रिकामे यांची निवड झाली. सदस्यांनी दाखविलेला विश्वास आणि आरक्षणामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबाचा कारभार हाकता हाकता या पती-पत्नीवर आता गावगाडा हाकण्याची जबाबदारी आली आहे. जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला.   

सरपंच, उपसरपंचपदाची निवडणुक अतिशय घऱगुती वातावरणात  पार पडली. नऊ सदस्य असलेल्या विंचूर गवळी आणि सूलतानपूर या ग्रुप  ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र शिरोळे यांच्या उपस्थितीत झाली. सरपंचपद महिला ओबीसी राखीव होते. त्यात अनिता विजय रिकामे यांनी अर्ज दाखल केला. सरपंच पदासाठी विजय दत्तात्रय रिकामे यांनी अर्ज दाखल केला होता. 

सरपंच व उपसरपंच पदासाठी दोन्ही जागांवर एकमेव अर्ज असल्याने निवडणुक निर्णय अधिकारी शिरोळे यांनी अनिता रिकामे यांना बिनविरोध सरपंच घोषित केले, तर त्यांचे पती विजय रिकामे यांना उपसरपंचपदी निवडून आल्याचे घोषित केले. ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पती-पत्नी बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. पती-पत्नी एकाच वेळी उपसरपंच व सरपंचपदी विराजमान होण्याची जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख