कोरोनाच्या लॅबविषयी 'या' खासदारांना आक्षेप 

प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेवरच खासदार उन्मेश पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.इंडियन मेडिकल रिसर्चकडे प्रयोगशाळेच्या वैधतेबाबत माहिती घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
2Unmesh_20Patil.
2Unmesh_20Patil.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात "कोरोना'चे रूग्ण वाढत आहे. मृत्यूदर वाढला आहे. अशा स्थितीत जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारासोबत आता त्या ठिकाणी नव्यानेच उभारण्यात आलेल्या "स्वॅब'तपासणी प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेवरच भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी इंडियन मेडिकल रिसर्च (आय.सी.एम. आर.)कडे प्रयोगशाळेच्या वैधतेबाबत माहिती घेणार असल्याचे त्यांनी "सरकारनामा'शी बोलतांना उन्मेश पाटील  यांनी सांगितले.

जळगाव जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे "स्वॅब'तपासणीसाठी तातडीने सरकारतर्फे स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे कामही सुरू झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील वाढती परिस्थिती लक्षात घेऊन खासदार उन्मेश पाटील यांनी या प्रयोगशाळेबाबतच शंका उपस्थित केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले कि या प्रयोगशाळेतील अहवालाबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. 

या प्रयोगशाळेकडून काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार झाले नाहीत, मात्र त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. जर त्यांचा अहवाल व्यवस्थित आला असता त्यांच्यावर उपचारही करता आले असते. त्यामुळे जर प्रयोगशाळेचे अहवालच संशयास्पद येत असतील तर रग्णांवर उपचार तरी कसे होणार असा प्रश्‍नही त्यानी उपस्थित केला आहे.

 खासदार पाटील म्हणाले कि, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेची सर्व माहिती आपण मागविली आहे. इंडियन मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ची या लॅबला मान्यता आहे की नाही याची माहितीही मागविली आहे.

"कोरोना'संसर्गाचे जळगाव जिल्ह्यातील स्वॅब तपासणी प्रारंभी कोल्हापूर येथे करण्यात येत होती. कालांतराने धुळे येथील लॅब सुरू झाल्याने त्या ठिकाणी तपासणी होऊ लागली. परंतु जिल्हयात "कोरोना'रूग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच स्वॅब तपासणीचा अहवाल उशिरा येत असल्यामुळे जळगावात लॅब करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली.

शासकीय स्तरावर जळगावात लॅब उभारण्याची घोषणा करण्यात येऊन तब्बल महिनाभरानंतर ही लॅब सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता त्या लॅबच्या अहवालावरच खासदारांनी आक्षेप घेतल्यामुळे प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या लॅबच्या बाबत आय.सी.एम.आर.कडून अधिकृत अहवाल आल्यानंतरच सत्य बाहेर येईल. तो पर्यंत खासदारांच्या आक्षेपामुळे या लॅबच्या अहवालावर प्रश्‍नचिन्हच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com