भाजपच्या खासदाराला दहा हजार ट्विटर फॉलोअर्सचे अप्रूप !

जळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या कामासाठी सक्रीय असतात. ट्विटरवर आज त्यांनी फॉलोअर्सचा दहा हजारांचा टप्पा गाठला. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करीत आभार मानले आहेत.
MP Unmesh Patil expressed happiness over having ten thousand followers on Twitter
MP Unmesh Patil expressed happiness over having ten thousand followers on Twitter

जळगाव : राजकारणाच्या बदलत्या काळात सोशल मीडियावर मिळणारे लाईक आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून संपर्क ठेवला जात आहे. त्यातून आपली लोकप्रियता आणि कामाचा आवाकाही जोखला जात आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या कामासाठी सक्रीय असतात. ट्विटरवर आज त्यांनी फॉलोअर्सचा दहा हजारांचा टप्पा गाठला. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करीत आभार मानले आहेत. 

जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार इंजिनियर आहेत. आपल्या मतदार संघाच्या कामासाठी ते सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉटस अप आणि ट्‌विटर आदी माध्यमांचा उपयोग करीत असतात. या माध्यमातून ते जनहितार्थ योजनांची अंमलबजावणी, विकास कामाच्या सूचना, तसेच प्रतिक्रिया देत असतात.

सद्य स्थितीत जिल्ह्यात त्यांनी केंद्रीय योजनेतून रस्त्यावरील हॉकर्सना दहा हजार रूपये देण्याची योजना सुरू केली आहे. या माध्यमातून ते मतदार संघातील प्रत्येक तालुक्‍यात जावून हॉकर्सची बैठक घेत आहे. त्यांना या योजनेची माहिती देवून त्यांना निधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या योजनेला हॉकर्सचाही चांगला प्रतिसाद मिळत आहेत. सोशल मीडियावरही त्यांनी याची माहिती पोस्ट केली आहे. 

ट्‌विटरवर त्यांनी आज (ता. 21 ऑगस्ट) फॉलोअर्सचा दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, की तुम्हा सर्वाच्या प्रतिसादामुळे दहा हजार ट्विटर फॉलोअर्सचा टप्पा आपण गाठला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिक्रिया व विकासासंबंधी सूचना, जनहितार्थ योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिसाद देवून सतत सोबत असणाऱ्या दहा हजार ट्विटर फॉलोअर्सला मनापासून धन्यवाद. त्यांनी या सोबत आपल्या ट्विटर अकाउंटचा फोटोही शेअर केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांचे फोटो टाकले आहेत. 

हेही वाचा : जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांना वाळू ठेकेदाराकडून लाच घेताना अटक 

जळगाव : जळगाव येथील प्रांताधिकारी श्रीमती दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप यांना वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. 21 ऑगस्ट) अटक केली आहे. वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी त्यांनी दोन लाख रूपयांची मागणी केली होती. 

जळगावात वाळू वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलडाणा यांचा वाळू वाहतुकीचा परवाना होता. मात्र, या वाहतूकदाराचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवारात उभे केले होते.

हे ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी लिपीक अतुल सानप यांच्या माध्यमातून दोन लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सव्वा लाख रूपये देण्याचे ठरले होते. 

या संदर्भात वाळू वाहतूकदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे भागाचे पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी सापळा रचून लिपीक अतुल सानप यांच्या खासगी पंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रक्कम स्वीकारताना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपिक सानप यांच्यासाठी रक्कम स्वीकारत असल्याचे सांतिल्याने त्या दोघांनाही अटक करण्यात आली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com