सारथीचे राज्यात महसूलनिहाय प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेला अधिकचे अनुदान उपलब्ध करुन संस्थेचे सक्षमीकरण करावे. मराठा समाजाच्या युवक, युवतीसाठी राज्यात महसूल विभागनिहाय स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र तसेच व्यावसायिक प्रशिक्षक केंद्र सुरु करण्यात यावे.
सारथीचे राज्यात महसूलनिहाय प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

नाशिक : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेला अधिक अनुदान उपलब्ध करुन संस्थेचे सक्षमीकरण करावे. मराठा समाजाच्या युवक, युवतीसाठी राज्यात महसूल विभागनिहाय स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र तसेच व्यावसायिक प्रशिक्षक केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मराठा समाजातील युवक-युवतींच्या तसेच समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांची भेट घेवून सारथीच्या सक्षमीकरणासाठी निवेदन दिले. यासंदर्भात खासदार गोडसे म्हणाले, सारथी संस्था मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांच्या स्रवांगिण प्रगतीसाठी सुरु केली आहे. मात्र समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत संस्थेला दिला जाणारा निधी खूपच कमी आहे. त्यामुळे संस्था निर्मितीचे उद्दीष्ट साध्य होताना दिसत नाही. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर समाजाच्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे. त्यादृष्टीने या समाजाचे सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गाचे सर्वेक्षण करुन मराठा समाजाच्या युवकांना रोजगार निर्मितीचे विविध कौशल्य शिकविण्यासाठी लहान कालावधीच्या प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करावे. महसूल विभागात उत्पादन होणाऱ्या फळे व पिकांवर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना देण्यात यावी.सुशिक्षित बेरोजगारांना व बेरोजगारांना स्वयंम रोजगारासाठी मदत करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह केंद्रीय लोकसेवा आयोग व अन्य सर्व शासकीय विभागांच्या स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासवर्ग सुरु करावेत. असा अनेक सकारात्मक प्रकल्प व उपक्रमांचा विचार व्हावा. 

राज्यातील सहा महसुल विभागनिहाय सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षा केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार गोडसे यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही मागणी न्यायिक असल्याने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री पवार यांनी खासदार गोडसे यांना सांगतिले.
..
विर्द्यांथयाना येथे पुणे प्रशिक्षण घेणे शक्य नसते. त्याएवजी प्रत्येक महसूल विभागात सारथीच्या माध्यमातून राज्यातील सहाही महसूल विभागनिहाय मंडळात स्पर्धा परिक्षा तथा व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु झाल्यास समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल. -  हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX-bP2I3&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=e8888a6d85f0a8a68aa0900535a3f8c0&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com