खासदार भारती पवारांनी परत पाठवला शाळेचा निकृष्ठ तांदुळ - MP Bharti Pawar send back Dirty quality Rice Of School | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार भारती पवारांनी परत पाठवला शाळेचा निकृष्ठ तांदुळ

संपत देवगिरे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

खासदार भारती पवार यांच्याकडे आलेल्या तक्रारींची त्यांनी दखल तर घेतलीच, मात्र थेट शाळेत जाऊन तांदळाची तपासमी देखील केली. हा निकृष्ठ तांदुळ परत पाठवून पुन्हा असा तांदुळ आल्यास संबंधीतांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

नाशिक : मध्यान्ह भोजन असो वा आश्रम शाळांना विद्यार्थ्यांसाठी मिळणारा तांदुळ निकृष्ठ दर्जाचा असल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. मात्र खासदार भारती पवार यांच्याकडे आलेल्या तक्रारींची त्यांनी दखल तर घेतलीच, मात्र थेट शाळेत जाऊन तांदळाची तपासमी देखील केली. हा निकृष्ठ तांदुळ परत पाठवून पुन्हा असा तांदुळ आल्यास संबंधीतांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

दुगाव (ता. नाशिक) येथील प्राथमिक शाळेला खासदार डॉ. भारती पवार यांनी अचानक भेट दिली. तेथील निकृष्ट दर्जाच्या तांदुळाची तपासणी केली. शासकीय योजनेतून विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनासाठी मिलच्या माध्यमातून तांदूळ व डाळ दिली जाते. दुगाव शाळेत येणारा तांदूळ हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी खासदार  डॉ. पवार यांचेकडे वारंवार आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अचानक दुगाव येथील शाळेला भेट दिली. यावेळी तेथील तांदूळ व डाळीची तपासणी केली. येथे आलेला तांदुळ व डाळ खरोखरच अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आढळले. तक्रारीत तत्थ्य आढळून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्याशी संपर्क केला. यावेळी त्यांनी आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांतील तक्रारी मांडल्या. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार केली. तसेच संबंधित पुरवठादाराची चौकशी करावी. चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध करावा अशी सूचना संबंधितांना केली. त्वरित चांगाल तांदुळ उपलब्ध करून  देण्याची मागणी केली. याप्रसंगी भाजपा नेते जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजपा नेते सुनील शेलार, सुनील क्षीरसागर, डॉ.सुनील सोनवणे, संजय पेंढारी आदी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख