मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीला भाजप करणार सेवाकार्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला येत्या ३० मेस सात वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी भाजपातर्फे शहराच्या सर्व भागा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य केले जाईल.
Bjp MLA
Bjp MLA

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( P. M. Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला येत्या ३० मेस सात वर्षे (BJP Government willcomplete 7 yers) पूर्ण होत आहेत. या दिवशी भाजपातर्फे शहराच्या सर्व भागा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य (Activist perform Service) केले जाईल. 

नाशिक शहर भाजपतर्फे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वेबेक्स मीटिंग (व्हच्युअल मीटिंग) झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शहराध्यक्ष श्री. पालवे म्हणाले, शहरातील नाशिक रोड, भगूर- देवळाली, पंचवटी, तपोवन, मध्य नाशिक, जुने नाशिक, द्वारका, सिडको १, सिडको २ , सातपूर या सर्व मंडलांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करण्यात येईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही.

ते पुढे म्हणाले, नाशिक शहरातील दाह मंडलांमध्ये भाजपाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी भेट देतील. त्या भागातील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. गावांमध्ये कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. त्यामध्ये मास्क वाटप, सॅनिटीझर वाटप, भाजीपाला वाटप, गरजूंना धान्य व शिधा वाटप लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन व सहकार्य यांचा समावेश असेल.

share">

जिल्ह्यातील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते त्यात सहभागी होतील. युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चातर्फे रक्तदान शिबीर होईल. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. केंद्रातील सरकारला सात वर्षे झाल्याने ३० मेस विशेष उपक्रम होतील. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल.

यावेळी नाशिकचे प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयकुमार रावल, प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, प्रदेश, महापौर सतिश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे,  प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने, प्रदीप पेशकर, प्रशांत जाधव, जगन अण्णा पाटील सहभागी झाले. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com