राष्ट्रवादी, भाजपच्या भूमाफिया नेत्यांना `मोक्का`ची वेसण - Mocca act impliment on Land Mafiya NCP & BJP leaders Of Nashik, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी, भाजपच्या भूमाफिया नेत्यांना `मोक्का`ची वेसण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

दोन महिन्यांपूर्वी गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत भूमाफियांनी सुपारी देत एका होमगार्डकडून वृद्ध जमीनमालकाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात सहभागी भूमाफियांच्या टोळीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे.

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत भूमाफियांनी सुपारी देत एका होमगार्डकडून वृद्ध जमीनमालकाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात सहभागी भूमाफियांच्या टोळीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे. या वीस जणांमध्ये राष्ट्रवादी कॅांग्रेस आणि भाजप नेत्यांचा समावेष आहे. यातील एक नेता फरारी आहे. 

शहरातील आनंदवली भागात १७ मार्चला रमेश मंडलिक (वय ७०) या ज्येष्ठ नागरिकाची गळा चिरून हत्या झाली होती. भूमाफियांनी शहरातील एका होमगार्डला सुपारी देत मंडलिक यांचा निर्घृणपणे खून केल्याचे निष्पन्न झाले होते. खुनाचा म्होरक्या सक्रिय भूमाफिया असल्याचे स्पष्ट झाल्याने आयुक्त दीपक पांडे यांनी गुरुवारी या संशयितांना मोक्का लावला.

अज्ञात अथवा किरकोळ वादातून हत्या झाल्याचे भासवून आनंदवलीतील मोक्याचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अखेर मोक्काची वेसण घालण्यात आली. अत्यंत शिताफीने नियोजनबद्ध पद्धतीने रमेश मंडलिक या वृद्ध जमीनमालकाची हत्या केली होती. पुरावे समोर नसताना पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करून टोळीचा पर्दाफाश केला होता. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी या गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी तब्बल १२ जणांना समोर आणले. शहरातील भूमाफियांची दादागिरी, त्यांची संघटित गुन्हेगारी असे मुद्दे पुढे आल्याने टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त पांडे यांनी त्याच वेळी जाहीर केला होता. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार केला.

यांच्यावर झाली कारवाई !
सचिन मंडलिक (३६, रा. मंडलिकनगर, आनंदवली), अक्षय ऊर्फ अतुल मंडलिक (२६, रा. नवश्या गणपतीजवळ), भूषण मोटकरी (३२, रा. रसोई हॉटेलच्यामागे), सोमनाथ मंडलिक (५०, कॅनॉल रोड, आनंदवली), दत्तात्रय मंडलिक (४७, कपिला बिल्डिंग, सिन्नर फाटा), नितीन खैरे (पद्मदर्शन प्लाझा, आनंदवली), आबासाहेब भंडागे (४१, रा. तुळजाभवानीनगर, पेठ रोड), भगवान चांगले (२७, रा. पेठ रोड), बाळासाहेब कोल्हे (५४, रा. राजबंगला कॉलनी, गंगापूर रोड), गणेश काळे (२५, रा. तुळजाभवानीनगर, पेठ रोड), वैभव वराडे (२१, रा. तुळजाभवानीनगर, पेठ रोड), सागर शिवाजी ठाकरे (२५, रा. गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर) यांना या गुन्ह्यात अटक आहे. रमी रजपूत आणि जगदीश मंडलिक हे दोघे गुन्हा समोर आल्यापासून फरारी आहेत.
...
भूमाफियांना आवरण्यासाठी यापुढे थेट महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई होईल.
-दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक
....
हेही वाचा...

भाजप नेते सतीश सोनवणेंच्या कार्यालयावरhttps://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/shivsena-workers-attacked-bjp-sonawanes-office-nashik-politics-75462 हल्ला

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख