`मनसे`च्या इशारा येताच खड्डे बुजले...तरीही आंदोलन झालेच! - MNS Warns NMC about poor roads in City | Politics Marathi News - Sarkarnama

`मनसे`च्या इशारा येताच खड्डे बुजले...तरीही आंदोलन झालेच!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

महत्वाच्या सरकारी कार्यालयाच्या रस्त्यांवरच खड्डे झाले. त्या विरोधात `मनसे`ने आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर खड्डे बुजवले मात्र चक्क मातीने. यात सोय कमी गौरसोय अधिक असल्याने आंदोलन झाले,

नाशिक : शहरात खड्डे नाही असा रस्ताच राहिलेला नाही. मात्र आता थेट विभागीय महसूल आयुक्त वो पोलिस ठाण्यासह महत्वाच्या सरकारी कार्यालयाच्या रस्त्यांवरच खड्डे झाले. त्या विरोधात `मनसे`ने आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर खड्डे बुजवले मात्र चक्क मातीने. यात सोय कमी गौरसोय अधिक असल्याने आंदोलन झाले, तेसुद्धा अधिक तीव्र स्वरुपाचे.

शहरातील रस्ते नादुरुस्त झाले आहेत. त्यावर सातत्याने विविध पक्ष आंदोलन करीत आहेत. एकीकडे आंदोलन व दुसरीकडे रोज लाखो रुपये खर्चून ज्यांनी रस्ते बनवले तेच पुन्हा रस्ता दुरुस्ती करुन आणखी कमाई करीत असल्याचे चित्र आहे. नासिक रोड परिसरात पोलीस ठाणे, विभागीय आयुक्तांच्या कार्यलया कडे जाणारा रस्त्याची खुप दयनीय अवस्था झाली आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या रस्त्यावर अतिशय धोकादायक खड्डे झाले आहेत. नागरिक, कामगार, शासकीय अधिकारी याबरोबरच पोलिसांची वसाहत येथे असल्याने त्याबाबत सगळेच त्रस्त आहेत. याच नादुरुस्त रस्त्यांने वाहतूक पोलिसांची देखील ये जा या होत असते, मोठ्या प्रमाणात रहदारी असुनही खड्डे आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने प्रतिकात्मक अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. हा रस्ता दरुस्त झाला नाही तर आंदोलन करण्यात येणार होते. त्यावर महापालिकेचे प्रशासन हलले. मात्र त्यांनी हे खड्डे चक्क माती टाकून बुजवले. त्यामुळे अशी दुरुस्ती केली नसती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रीया आली. त्यामुळे मनसेतर्फे आंदोसन झालेच. कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलन करुन निवेदन देताना रस्त्या योग्य प्रकारे दुरुस्त झाला नीह तर खड्डयात टाकलेली माती अधिका-यांच्या घरी आणून टाकू असा इशारा यावेळी देण्यात आला. 

यावेळी नासिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, कामगार नेते प्रकाश कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने , प्रमोद साखरे, प्रदेश सदस्य उमेश भोई, शशी चौधरी प्रदेश सदस्य, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे, विभाग अध्यक्ष नितिन धानपुने,  शहर संघटक नितीन पंडीत, अदित्य कुलकर्णी व मयुर कुक्डे उपस्थितीत होते.
....

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख