`मनसे`चा इशारा...कोविड काळातील वीज बिलाची लूटमार थांबवा! - MNS Warns for heavy electricity billing... | Politics Marathi News - Sarkarnama

`मनसे`चा इशारा...कोविड काळातील वीज बिलाची लूटमार थांबवा!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या लॅाकडाऊनच्या कालावधीत बहुतांश उद्योग बंद होते. नागरिकांचे रोजगार गेले. आर्थिक समस्या निर्माण झाल्या. मात्र या कालावधीत वीज बिलात सवलत अपेक्षीत असतांना अव्वाच्या सव्वा बील आकारणी करण्यात आली होती. ही अवाजवी दरवाढ व बीले यातून नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे.

नाशिक : कोरोनाच्या लॅाकडाऊनच्या कालावधीत बहुतांश उद्योग बंद होते. नागरिकांचे रोजगार गेले. आर्थिक समस्या निर्माण झाल्या. मात्र या कालावधीत वीज बिलात सवलत अपेक्षीत असतांना अव्वाच्या सव्वा बील आकारणी करण्यात आली होती. ही अवाजवी दरवाढ व बीले यातून नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे. 

यासंदर्भात शहरातील सातपूर औद्योगिक वसाहत विभागातील नागरिकांनी यासंदर्भात विविध स्तरावर निवेदन दिले होते. प्रत्येक वेळा त्यांना आश्वासन देण्यात आले. सरकारने देखील याबाबत लवकरच दिलासा मिळेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही, असे मनसेचे नेते, नगरसेवक सलीम शेख यांनी सांगितले. 

२२ मार्च २०२० ते जून २०२० पर्येंत दुकाने, औद्योगिक आस्थापना बंद होत्या.  तरीही प्रत्यक्ष वीज वापर न होता बिले कशी आली. आम्ही घरगुती वीज वापर केला, मात्र तीन ते चार पट वीजची देयके आली. त्यामुळे जेव्हढा वापर केला, त्याचेच बील भरणार अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे. नागरिकांना वीज फुकट नको आणि माफीही नको, मात्र कोणत्या नियमान्वये वीजेच्या बिलाची आकारणी झाली, ते समजून सांगा. त्या बाबत जनतेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवा. वीज मीटरचे पुन्हा नव्याने रिडींग घेऊन योग्य वीज बिले द्या. सरासरी वीजबिल देणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे, ही शुद्ध फसवणूक आहे.
....
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख