भूखंडांचा विषय सोडा अन्यथा...मनसेचा भाजपला इशारा - MNS Warns BJP on NMC polts; Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

भूखंडांचा विषय सोडा अन्यथा...मनसेचा भाजपला इशारा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

शहरातील महापालिकेच्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्यास भाजपला सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी दिला.

नाशिक : शहरातील महापालिकेच्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्यास भाजपला सडेतोड उत्तर दिले जाईल, (IF Bjp transfers prime location 11 polts to builders MNS will Protest) असा इशारा मनसेचे नगरसेवक सलीम शेख (Salim Shaikh) यांनी दिला. 

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना त्यांनी निवेदन दिले. महापालिकेच्या मोक्याच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा विषय महासभेवर कुठलीही चर्चा न करता मंजूर करण्यात आला. या विषयावर नगरसेवकांचे मत जाणून घेणे गरजेचे होते. मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव जादा विषयात घुसून रेटून नेला. मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सत्तारूढ भाजपचा कुटिल हेतू आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे महापालिकेच्या हिताला बाधा पोचत आहे. 

शहराच्या विकासाला आकार देणाऱ्या मिळकती खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्यास शहराला बकाल स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या मिळकती बीओटीवर विकसित करण्यास तीव्र विरोध आहे. तसे झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सलीम शेख यांनी दिला. भाजपचा हा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला. 
...
हेही वाचा...

नीलम गो-हे यांनी घेतली `मीडिया ट्रायल` वाल्यांची झाडाझडती!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख