`मनविसे` म्हणते आमच्याकडे फक्त रिझल्ट असतो...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेत संत नामदेव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकेरी उल्लेख करण्यात आला होता, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी विद्यापीठाच्या कार्यालयात गेले. त्यांनी या प्रकाराचा निषेध करीत जाब विचारला.
`मनविसे` म्हणते आमच्याकडे फक्त रिझल्ट असतो...

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेत संत नामदेव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकेरी उल्लेख करण्यात आला होता, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी विद्यापीठाच्या कार्यालयात गेले. त्यांनी या प्रकाराचा निषेध करीत जाब विचारला. त्यामुळे विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त करुन प्रश्नपत्रिका तयार करणा-या संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे. 

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिका-यांना दिलगिरीचे पत्र विद्यापीठातर्फे देण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या सोमवारी झालेल्या कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या मराठी विषयाच्या पेपरला छत्रपती शिवाजी महाराज, संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा प्रश्नपत्रिकेत एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर `मनविसे`कडे काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर, `मनविसे`ने मंगळवारी विद्यापीठामध्ये जाऊन या  प्रकाराबाबत कुलगुरू ई.वायूंनंदन यांना जाब विचारला. या सर्व प्रकाराबद्दल महाराष्ट्रातील जनतेची, शिवप्रेमीची, वारकरी संप्रदायाची कुलगुरूंनी दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात प्रशासनाने माफी मागितली असा दावा `मनविसे` पदाधिका-यांनी केली. या प्रकाराची कुलगुरूंनी गंभीर दखल घेत संबंधित प्रश्नपत्रिका काढणाऱ्या आस्थापनेला पुढील पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची घोषणा यावेळी केली, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील यासंदर्भात माफीनामा प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी `मनविसे`चे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, शहर सरचिटणीस प्रशांत बारगळ, उपाध्यक्ष प्रसाद घुमरे आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com