महानगरपालिका निवडणुक तयारीसाठी मनसेचा बैठकांचा धडाका - MNS Starts wardwise meeting in the city | Politics Marathi News - Sarkarnama

महानगरपालिका निवडणुक तयारीसाठी मनसेचा बैठकांचा धडाका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थोडी लवकरच कंबर कसली आहे. सध्या पक्षाकडून नव्या पदाधिकारी नियुक्तीसह शहराच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. त्यासाठी पक्षाच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. 

नाशिक : आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थोडी लवकरच कंबर कसली आहे. सध्या पक्षाकडून नव्या पदाधिकारी नियुक्तीसह शहराच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. सर्व पदाधिकारी सक्रीय झाल्याने प्रभागनिहाय बैठकाचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे `मनसे` पुन्हा एकदा शहरात राजकीय चर्चेत आला आहे. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या उपस्थितीत प्रभाग बैठका सुरु झाल्या आहेत. सध्या रोजच या बैठका होत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांतील समस्यांचा आढावा घेण्याबरोबरच प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने नागरिकांशी संपर्क वाढवावा, अशा सुचना दिल्या जात आहेत. 

महापालिकेत २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सर्वात मोठा पक्ष होता. सुरवातीला राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या मदतीने आणि त्यानंतर अन्य पक्षांच्या मदतीने ते पाच वर्षे महापालिकेत ते सत्तेत राहिले. मात्र टर्म पुर्ण होईपर्यंत त्यांचे पंचवीसहून नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षात निघून गेले. त्याचा फटका त्यांना निवडणूकीत बसला. तेव्हा मनसेकडून निवडणूकीची तयारी उशीरा सुरु केली होती, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. त्याची झळ निष्ठावंत कार्यकर्ते, उमेदवारांना बसली. त्यापासून धडा घेत मनसे यंदा जोरकसपणे तयारी करीत आहे. त्यांनी विविध पदाधिका-यांची खांदेपालट केली. त्याचा किती राजकीय लाभ मनसेला मिळतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.
....  
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख