शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार पुढे सरसावले..

पीक विमा मंजूर न झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार आणून द्यावी, असे आवाहन अमळनेरचे (जि.जळगाव) आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
4anil_20patil_1.jpg
4anil_20patil_1.jpg

जळगाव : पीक विम्याचे हप्ते भरूनही अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला नाही. मात्र, तक्रार करूनही पीक विमा कंपन्या ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार पुढे सरसावले आहेत. पीक विमा मंजूर न झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार आणून द्यावी, असे आवाहन अमळनेरचे (जि.जळगाव) आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

तालुक्यातील काही संगणक सेवा केंद्रांवर 2019 चा पीक विम्याचे हप्ते घेताना अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पावत्या देण्यात आल्या. मात्र, तो पैसा विमा कंपनीकडे भरलाच नाही, यावर्षी आमदार अनिल पाटील यांनी सरकारकडे पाठपुरावा करून कापूस पिकाचा विमा मंजूर करून घेतला गेल्यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विमा रक्कम मंजूर झाली आहे. मात्र, संगणक सेवा चालकांनी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची रक्कम परस्पर हडप केल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱयांची संख्या मोठी आहे.

शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून त्यांनी आमदारांकडे धाव घेतली. परंतु, विमा कंपनीला हप्त्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नोंदी कंपनीकडे नसल्याने विमा मिळू शकत नाही सुमारे साडे तीनशे शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांचा विम्याचे नुकसान झाल्याने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडे दाद मागावी लागेल म्हणून आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तालुका कृषी अधिकारी व आमदार कार्यालयात एक एक प्रत द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

दरवर्षी पीक विमासाठी कापणी प्रयोगाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने पारदर्शी प्रयोग घेण्याबाबत शिबिरही घेण्यात आले आहे. त्यामुळे ही जबाबदारी आता स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक व शेतकऱ्यांवर आहे, यंदा शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी केले आहे
Edited  by : Mangesh Mahale 


#SSRSuicide :  अंकिता लोंखडे हीच्या टि्वटची चर्चा. 

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केली आहे. सुशांतची बहिण श्र्वेता सिंह कीर्ती हिनेही आपल्या भावाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हीने टि्वट केले आहे. यात अंकिताने म्हटले आहे की ''सत्याचाच विजय होईल'' ('Truth Wins') अंकिता लोंखडेंच्या या टि्वटवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुशांत सिंह रजपूत यांच्या निधनानंतर अंकिता खूपच निराश होती. यातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. काल सुशांतचे वडीलांनी याबाबतची तक्रार पाटना पोलिसांकडे दाखल केली आहे. यानंतर अंकिताने हो आज टि्वट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com