`हे` आमदार असतात दिवसभर कोरोना रुग्णांच्या संपर्कात, रुग्णालयातही गाठीभेटी! - This MLA whole day is in contact with covid19 patients | Politics Marathi News - Sarkarnama

`हे` आमदार असतात दिवसभर कोरोना रुग्णांच्या संपर्कात, रुग्णालयातही गाठीभेटी!

संपत देवगिरे
सोमवार, 6 जुलै 2020

आमदार राहुल ढिकले मात्र दिवसभर मतदारसंघातील कोरोना बाधीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या भेटींत व्यस्त असतात. सकाळपासूनच त्यांना कोरोना बाधीत नागीरकांच्या मदतीसाठी फोन येतात. या सगळ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न ते करतात. 

नाशिक : अधिकारी, डॉक्‍टर्ससह अगदी राजकीय नेतेही कोरोनाचा धसका घेऊन घरी बसलेले दिसतात, किंवा घर सोडून स्थलांतर झाल्याचे पहायला मिळते. येथील आमदार राहुल ढिकले मात्र दिवसभर मतदारसंघातील कोरोना बाधीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या भेटींत व्यस्त असतात. सकाळपासूनच त्यांना कोरोना बाधीत नागीरकांच्या मदतीसाठी फोन येतात. या सगळ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न ते करतात. एव्हढेच नव्हे तर थेट रुग्णालयांत जाऊनही त्यांना दिलासा देण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचा हा उपक्रम चांगलाच चर्चेत आहे. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले यांनी आज सकाळी डॉ. पंजाबरा देशमुख वसतिगृहातील कोविड 19 सेंटर ला भेट दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रुग्णांच्या नातेवाईकांचीीह विचारपूस केली. या कोविड 19 फायटर्सच्या कामाचोैकतुक करीत त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी रुग्णांचीही भेट घेतली. कोरोनाशी लढा देतांना कोणती पत्थ्ये पाळली पाहिजेत यांसह व्यायाम आणि आहाराविषयी त्यांनी सुचनाही केल्या. यावेळी "कोविड 19' सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावेली त्यांनी महापालिका आयुक्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना या केंद्रातील अडचणी त्वरित सोडविण्याच्या सूचना दिल्या.

येथील खाटांची संख्या 156 आहे. त्यात सध्या 83 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 51 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने येथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारीका, वार्डबॉयची संख्या वाढवावी. संगणक व डाटा एन्ट्री ऑपरेटर उपलब्ध करण्यात यावेत. स्वयंसेवी संस्थांमार्फत जेवण, नास्ता पुरविण्यात यावा. याबाबत प्रशासनाने उपयोजना करीत आहे. पौष्टीक आहार व रुग्णांना अंघोळीला गरम पाणी उपलब्ध करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, आदींबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांनी माहती दिली. कोविड सेंटरमध्ये भेटी घेतांना एका रुग्णाच्या मुलाने त्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. "मविप्र' संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या वडिलांची माहिती दिली. यासंदर्भात आमदार ढिकले यांनी तातडीने त्या रुग्णाशी संपर्क करुन विचारपूस केली. त्याबाबत त्याच्या कुंटुंबियांनाही माहिती दिली. 

पंचवटीमध्ये फुलेनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्यावर या सबंध भागाची पाहणी करुन येथील रस्ते बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. या भागात सध्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधींनीही कोरोना संसर्गाचा धसका घेऊन घराबाहेर पडणे बंद केले आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नाताईवाईक अडचणीत असल्याने नाराजीचे वातावरण आहे. अशा स्थितीत आमदार ढिकले यांनी मात्र थेट रुग्णालयांना भेटी देऊन दिवसभर मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे या उपक्रमाचा प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. 
.... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख