आमदार सुरेश भोळेंना त्यांच्या पात्रतेची जाणीव करून देऊ!

आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला. आमदार भोळे यांनी टिका करताना प्रारंभी आपली क्षमता, पात्रता लक्षात ठेवली पाहिजे. त्यांनी आपली पात्रता तपासावी, असे शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे यांनी सांगितले.
Suresh Tayde- Bhole
Suresh Tayde- Bhole

जळगाव : आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला. आमदार भोळे यांनी टिका करताना प्रारंभी आपली क्षमता, पात्रता लक्षात ठेवली पाहिजे. त्यांनी आपली पात्रता तपासावी, असे शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात शहराचे आमदार भोळे यांनी ट्वीट केले् होते. या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती त्याला उत्तर देताना तायडे यांनी वरील भाष्य केले.

श्री. तायडे म्हणाले, आमदार भोळे यांनी शहरातील जनतेला मामा बनवण्याचे काम बंद करावे. ज्यांना आपल्या पक्षातले नगरसेवक कंटाळले होते त्यांना मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कामावर विश्वास ठेऊन अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य भाजपाला सोडचिट्ठी देत आहेत. त्यामुळे `मामांचे` मानसिक संतुलन बिघडले असावे असा टोलाही त्यांनी लगावला. ज्या उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली त्यांच्याच आदेशाने आम्ही आपल्यासाठी निवडणुकीत मते मागीतल्याची आठवण कदाचित मामांना नसावी यापुढे जर मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असेही त्यांनी सांगितले.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com