आमदार हिरे म्हणतात, आमच्या आंदोलनाचा विजय झाला! - MLA Seema Hiray says it is our agitation`s Victory | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार हिरे म्हणतात, आमच्या आंदोलनाचा विजय झाला!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

सोमेश्वर येथील बालाजी मंदिर उघडण्यात आले. यावेळी आमदार सीमाताई हिरे, महेश हिरे यांनी अभिषेक करून मंदिर उघडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला. 

नाशिक : आज बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याच्या दिवशी राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार सोमेश्वर येथील बालाजी मंदिर उघडण्यात आले. यावेळी आमदार सीमाताई हिरे, महेश हिरे यांनी अभिषेक करून मंदिर उघडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला. 

यासंदर्भात आमदार हिरे म्हणाल्या, गेल्या चार महिन्यापासून मंदिरं उघडण्यासाठी जे आंदोलन आम्ही उभं केलं , या आंदोलनाला आणि आमच्या लढ्याला अखेर आज यश आलं. दिवाळीनंतर नियमावली तयार करू, त्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्यां  मुख्यमंत्र्यांना दिवाळीतच पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याची सदबुद्धी भगवंतानी दिली. हिंदुत्वाचा विजय झाला आणि ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडाला. 

यावेळी रोहिणी नायडू, संगीता शेळके, रामहरी सभेराव, नारायण जाधव, अमोल इघें, राजेंद्र चिखले, गौरव बोडके यांसह विविध पदाधिकारी उपस्थित  होते. 
...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख