राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंसह कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
saroj ahire
saroj ahire

नाशिक  : मेहुण्यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईला गेलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे तीथेच बारा दिवस थांबल्या. तो परिसर रेड झोन जाहिर करण्यात आला होता. त्यामुळे त्या नाशिकला परतल्यावर होम क्वारंटाईन झाल्या होत्या. आज सायंकाळी त्यांच्यासह कुटुंबातील तिघांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले. त्यांनी स्वतः त्याची पृष्टी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या पुढील चौदा दिवस त्या होम क्वारंटाईन राहणार आहेत.  कोरोना पॅाझिटिव्ह आढळलेल्या त्या जिल्ह्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी आहेत. यासंदर्भात त्यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतः सोशल मिडीयावर पोस्ट टाकली होती. आपण स्वतःहून दहा दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. त्यांच्या भगीनीच्या पतीचे (मेहुण्यांचे) 14 मे रोजी मुंबईला निधन झाले. त्यासाठी त्या मुंबईला गेल्या होत्या. तेथे त्यांनी बारा दिवस मुक्काम केला. हा परिसर रेड झोन जाहीर करण्यात आलेला होता.

सोमवारी नाशिकला परतल्यावर त्यांना कोरोना विषयी संशय वाटल्याने तसेच वैद्यकीय अधिकारी व प्रशसानाने सूचना केल्याने त्यांच्या घशाताली स्त्रावाचे नमुणे घेण्यात आले होते. हे नमुने तपासण्यासाठी नाशिकच्या डॅा. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच संबंधित रसायन उपलब्ध नव्हते. त्यामुळे या लॅबमधील तपासणीचे काम सध्या ठप्प आहे. त्यामुळे हे नमुने अन्य शहरात पाठवावे लागले. त्याचा अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन होण्याशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता. आज सायंकाळी त्यांच्या स्त्रावाचा अहवाल पप्राप्त झाला. त्यात त्या पॅाझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य देखील पॅाझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण असू शकतात. त्यामुळे मुंबईसह नाशिक रोड भागातील नागरीक व कार्यकर्ते यांचीची तपासणी केली जाईल. त्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीतील नागरिकांची देखील सायंकाळी तपासणी सुरु करण्यात आली होती.  

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॅांग्रेसचे विविध नेते नाशिकला आले  होते. गृहमंत्री अनिल देशमुख काल नागपूरला जातांना नाशिकला थांबले होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांना कॅाग्रेस आघाडीच्या आमदारांची बैठक घेतली होती. त्यालाही त्या उपस्थित नव्हत्या.

यासंदर्भात त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे. मी मुंबईला कोरोना असलेल्या रेड झोनमध्ये मुक्काम केला. त्यामुळे मला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्याबाबत वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल. त्यासाठी आज सायंकाळी  अहवाल प्राप्त झाला. वैद्यकीय अधिकारी सांगतील त्यांच्या सर्व सुचनांचे पालन करणार आहे. मला बोलायला त्रास होत असल्याने त्यांनी सोशल मिडीयावर संदेश दिला आहे. माझ्यामुळे नागरीकांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी मी लोकांच्या भेटीगाठी बंद केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com