MLA Sanjay Saavkare's corona report is positive | Sarkarnama

आमदार संजय सावकारेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अधिवेशनाला जाण्यापूर्वी देखील आमदारांनी कोरोना चाचणी केली होती.

भुसावळ : भारतीय जनता पक्षाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगराध्यक्षांनंतर आता आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आज (ता. 15 सप्टेंबर) स्पष्ट झाले आहे. 

राज्याचे पावसाळी अधिवेशन आटोपून आलेले आमदार संजय सावकारे यांनी अँन्टीजेन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते गोदावरी रुग्णालयात सोमवारी (ता. 14 सप्टेंबर) उपचारार्थ दाखल झाले. अधिवेशनाला जाण्यापूर्वी देखील आमदारांनी कोरोना चाचणी केली होती. मात्र, अधिवेशनाहून परतल्यानंतर त्यांना शंका वाटल्याने त्यांनी पुन्हा चाचणी केल्याने अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

या दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व घाबरून जाण्याचे कारण नाही. निश्‍चितपणे आजारावर मात करता येते, असे आवाहन आमदार सावकारे यांनी केले आहे. नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर आता आमदार संजय सावकारे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

हेही वाचा : राज्यात आतापर्यंत 202 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू 

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत आठ पोलिसांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई व रत्नागिरी येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा 202 वर पोचला आहे. 

राज्यात गेल्या 24 तासांत आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबई व रत्नागिरीतील दोन अधिकाऱ्यांसह ठाणे शहर, नाशिक शहर, सांगली, जळगाव, नंदूरबार व उस्मानाबाद येथील प्रत्येकी एका पोलिसाचा समावेश आहे. राज्यातील ग्रामीण विभागामध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चिंतेचा विषय ठरत आहे. 

बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

याशिवाय 371 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 19 हजार 756 वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्य पोलिस दलात सध्या तीन हजार 724 सक्रिय कोरोनाग्रस्त पोलिस आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख