ढिकले यांच्या आमदार निधीतून दीडशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  - MLA Rahul Dhikle Given funds for Oxign concentrator, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

ढिकले यांच्या आमदार निधीतून दीडशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेत कोरोना बचावासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आमदार ढिकले यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार निधीतून दीडशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेत कोरोना बचावासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आमदार ढिकले यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार निधीतून दीडशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात व डॉ. श्रीवास यांची भेट घेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्राचार्य प्रशांत पाटील, नगरसेवक प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. आमदार ढिकले यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सूचना केल्या. या वेळी औद्योगिक कंपनी व्यवस्थापकांसमवेत चर्चा करून जिल्हा रुग्णालय, भाजपच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडाच्या माध्यमातून ईएसआयसी दवाखाना सातपूर येथे ५० बेड, आयुर्वेदिक हॉस्पिटल पंचवटी १०० बेड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात १०० बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १०० बेड वाढविण्यासाठी लागणारी नवीन ऑक्सिजन लाइन करण्याच्या मागणीनुसार शहरातील काही देणगीदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्याकरिता त्यांच्या मागणीचे आश्वासन देण्यात आले. पूर्व मतदारसंघात वाढत्या कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांना व नातेवाइकांना ऑक्सिजन बेडसाठी वणवण करावी लागत असल्याने आमदार ढिकले यांनी आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर १५० मशिन उपलब्ध करून देण्याचे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख