आमदार नितीन पवारांचे प्रयत्न यशस्वी, मिळाला सतरा कोटींचा निधी 

पाच वर्षांत कळवण शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार नितीन पवार यांच्या अथक प्रयत्नाने विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, नुकताच शहरातील विविध विकासकामांसाठी सतरा कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी दिली.
Nitin Pawar
Nitin Pawar

कळवण : पाच वर्षांत कळवण शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar efforts success) यांच्या अथक प्रयत्नाने विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, नुकताच शहरातील विविध विकासकामांसाठी सतरा कोटींचा निधी (17 crores Fund For Kalwan) प्राप्त झाल्याची माहिती नगरपंचायत गटनेते कौतिक पगार (Kautik Pagar) यांनी दिली.

कळवण शहरातील विकासकामांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून, आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नाने व गटनेते कौतिक पगार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत दहा कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान सात कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. 

कळवण शहर राजकीयदृष्ट्या जागरूक आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी सातत्याने विविध प्रश्नांवर पाठपुरावा करीत असतात. नगरपंचायतीचे सदस्य व नागरिकांनी विविध विकासकामांसाठी नगरपंचयातचे गटनेते कौतिक पगार व आमदार पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्यादृष्टीने थेट नागरिकांशी संबंधित कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. 

विकासकामांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे , वॉर्ड १४ मध्ये मोठादेव नाला रस्ता मजबूतीकरण करण्यासाठी ४.५० कोटी, वॉर्ड ५ आधार हॉस्पिटल ते मधुकर पगार रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटारासाठी ७५ लाख, वॉर्ड १२ मध्ये अंजूम मिर्झा यांच्या घरासमोरील संरक्षक भिंत ५५ लाख, वॉर्ड ५ मध्ये डॉ. सम्राट पवार हॉस्पिटल ते एमएसईबी पूल बांधकामासाठी एक कोटी, वॉर्ड एकमध्ये शनी मंदिर ते सती माता मंदिर जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यासाठी तीन कोटी, अप्पा बुटे ते आठवडे बाजारपर्यंत पाइप गटार व रस्त्यासाठी २३ लाख, वॉर्ड पाचमध्ये सिव्हिल हॉस्पिटल ते आबा सूर्यवंशी घरापर्यंत कुलस्वामिनी कॉलनी रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३९ लाख, रिलायन्स टॉवर रेणुका कॉलनी ते रामनगर रस्ता काँक्रिटीकरणासाठी २२ लाख, वॉर्ड १२ मध्ये भोसले तात्या ते दीपक सोनवणे घरापर्यंत व साळुंखे तात्या ते बिरारी घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी १३.५० लाख, वॉर्ड १४ मध्ये आर. आर. चव्हाण ते कैलास गोसावी रस्ता काँक्रिटीकरणासाठी नऊ लाख, वॉर्ड तीनमध्ये सांस्कृतिक भवन परिसरात पाइप गटार करण्यासाठी २४ लाख, वॉर्ड १७ मध्ये संदीप पगार ते वीरा गार्डन व कडू धर्मा पगार ते उमेश बच्छाव घरापर्यंत डांबरीकरणासाठी १३ लाख, वॉर्ड १३ मध्ये पंडित देवमन पगार ते एस. बी. पाटील रस्ता काँक्रिटीकरणासाठी दहा लाख,

वॉर्ड ११ मध्ये अशोक पगार ते वाघ सर व ॲड. संजय पवार पांधी रस्ता व कुंभारवाडा ते संजय लोहार डांबरीकरण रस्त्यासाठी २० लाख, वॉर्ड १७ मध्ये मोहाळी येथे ओपन स्पेस, गार्डन, ग्रीन जिम २५ लाख, वॉर्ड चारमध्ये ॲड. धनंजय पाटील यांच्या घराजवळील ओपन स्पेस कंपाउंड व सुशोभीकरणासाठी ३६ लाख, वॉर्ड दोनमध्ये स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधण्यासाठी ७५ लाख, वॉर्ड दहामध्ये साईबाबा मंदिरालगत ओपन स्पेस कंपाउंड व सुशोभीकरणासाठी १३ लाख, वॉर्ड दोनमध्ये जंगम स्मशानभूमी संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी २० लाख, वॉर्ड एकमध्ये कब्रस्तान संरक्षक भिंत व रस्ता सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. या वेळी विशेष सामिती सभापती व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com