आमदार मौलाना मुफ्तींची स्थिती `नाचता येईना, अंगण वाकडे` - MLA Maulana mufti didn`t know how to wojk for people | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आमदार मौलाना मुफ्तींची स्थिती `नाचता येईना, अंगण वाकडे`

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

‘एमआयएम’चे मालेगाव मध्य विधानसभेचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना मुळात काम कसे करावे, हेच माहीत नाही. काम करण्याची इच्छाच नसल्याने आपले अपयश लपविण्यासाठी ते माजी आमदार पिता-पुत्र काम करू देत नाहीत, अशी टीका करीत आहेत. 
 

मालेगाव : ‘एमआयएम’चे मालेगाव मध्य विधानसभेचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना मुळात काम कसे करावे, हेच माहीत नाही. (MLA Maulana Mufti dont had desire of public works) काम करण्याची इच्छाच नसल्याने आपले अपयश लपविण्यासाठी ते माजी आमदार पिता-पुत्र काम करू देत नाहीत, (To hide this failure he blaims Shaikh father & sons) अशी टीका करीत आहेत. ही परिस्थिती म्हणजे ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी असल्याची टीका माजी आमदार रशीद शेख (MLA Rashid Shaikh) यांनी केली.

येथील ऊर्दू मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. शेख म्हणाले, की मुफ्ती इस्माईल आपले अपयश लपवून किती काळ नागरिकांची दिशाभूल करतील, त्यांची ही जुनी सवय आहे. काम करता येत नसल्याने ते आमच्यावर आरोप करीत आहेत. माजी आमदार आसिफ शेख यांनी भाजपच्या कटकारस्थानाच्या सरकारमध्ये विरोधी पक्षात असताना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. आमचे काम जमिनीवर दिसत आहे.

मौलाना मुफ्ती यांनी आमदार म्हणजे काय ते समजून घ्यावे. आपण स्वत: विरोधी पक्षाची सत्ता असताना कोट्यवधी रुपयांची कामे केली. उड्डाणपुलाबद्दल त्यांची गोंधळाची स्थिती आहे. जेव्हा पूल बांधला जात होता, तेव्हा ते माझे काम आहे, असे सांगत. पडद्यामागून पुलाचे काम थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. या पुलासाठी आसिफ शेख यांनी निधी आणल्याचे सर्वश्रुत आहे. उड्डाणपुलाचे काम मोठ्या संघर्षाने सुरू झाले आहे. सामान्य रुग्णालयासाठी आम्ही ५० कोटी रुपये मंजूर केले. आम्ही महापौर असतानाच्या कामाची चौ

कशी करण्याच्या त्यांच्या मागणीचे आपण स्वागत करतो.

मनपाने हारुण अन्सारी हॉस्पिटलला एक कोटी रुपये मंजूर केले. रिक्त ६८ पदे भरली जातील. महापालिकेत बीयूएमएस (युनानी) डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी काम करत आहोत. एक्स-रे व सिटी स्कॅन मशिनसाठी सरकारकडून निधी आणण्याचा प्रस्ताव करीत आहोत.

जुन्या महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातील कामे जनतेला माहीत आहेत. दोन वर्षांत येथे काम करता न आल्याने ते निरर्थक टीका करीत आहेत. इस्माईल अन्सारी, जैनू पठाण, हाफीज अन्सारी, मोहम्मद रिजवान आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा...

`निवडणूक ही संधी, तीचे सोने करा `

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख