आमदार सीमा हिरेंपेक्षा नगरसेवकांची विकासकामे अधिक! - MLA Hire didnot done devolopment in Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सीमा हिरेंपेक्षा नगरसेवकांची विकासकामे अधिक!

प्रमोद दंडगव्हाळ
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

विधानसभा निवडणूकीला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र आमच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदारांनी काय काम केले, हेच कळत नाही. गेल्या सहा वर्षात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी जेव्हढी कामे केली, त्यापेक्षा अधिक कामे मी नगरसेवक म्हणून करुन दाखवली आहेत,

सिडको : विधानसभा निवडणूकीला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र आमच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदारांनी काय काम केले, हेच कळत नाही. गेल्या सहा वर्षात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी जेव्हढी कामे केली, त्यापेक्षा अधिक कामे मी नगरसेवक म्हणून करुन दाखवली आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप दातीर यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होऊन एक वर्षाचा कालावधी झाला. या निवडणूकीत श्री. दातीर हे `मनसे`चे उमेदवार होते. भाजपच्या हिरे यांनी त्यांचा पराभव केला होता. यासंदर्भात श्री. दातीर यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघाचा विकास रखडला आहे. आता आम्हीलाच पुन्हा शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागेल. आमदार हिरे यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांनी सहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात जेवढा विकास अथवा निधी खर्च केला नसेल,त्याच्या दुप्पट विकासकामे व निधी आपण नगरसेवक असतानाच्या कार्यकाळात आपल्या प्रभागात खर्च केल्याचा दावा करुन श्री. दातीर यांनी आमदार हिरे यांच्या कामांची खिल्ली उडविली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या आमदार हिरे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती नुकतीच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धुमधडाक्यात साजरी केली. भाजपने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. नेमका हाच धागा पकडत मनसे जिल्हाप्रमुख व नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेची उमेदवारी केलेले नगरसेवक दातीर यांनी विकास कामाच्या प्रश्नावर आमदार हिरे यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, हिरे यांची आमदारकीची ही दुसरी टर्म सुरू असताना सहा वर्षे होऊनही अद्यापपर्यंत आमदार व नगरसेवक यांची कोणती कामे असतात यातील फारसा फरक त्यांना उमगलेला नाही. एका प्रभागात एक नगरसेवक जितकी काम करतो तितकीच कामे त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत. ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन टाकणे, सभामंडप, ग्रीन जिम यासारखी किरकोळ कामे प्रभागातील एक साधा नगरसेवक आपल्या निधीतून करतो. 

सामान्य नागरिक देखील हे सांगू शकतो. महापालिकेची कामे आमदार करु लागला, तर काय म्हणावे?. मतदारांनी विश्वास ठेवून त्यांना दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवावा. मोठी कामे करुन दाखवावीत. रोजगार निर्मितीवर भर द्यावा, असे  श्री दातीर म्हणाले.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख