आमदार हिरामण खोसकरांनी बांधावर जाऊन शेतक-यांना दिला धीर! - MLA Hiraman Khoskar reach to farmers | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार हिरामण खोसकरांनी बांधावर जाऊन शेतक-यांना दिला धीर!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

परतीच्या पावसामुळे राज्याच्या विविध भगात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही विविध भागातील शेतीला पावसाने झोपडले. हे प्रमाण मोठे नाही. मात्र मतदारसंघातील नुकसानीसाठी लोकप्रतिनिधी मात्र शेतक-याच्या बांधावर जात आहेत.   

नाशिक : परतीच्या पावसामुळे राज्याच्या विविध भगात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही विविध भागातील शेतीला पावसाने झोपडले. हे प्रमाण मोठे नाही. मात्र मतदारसंघातील नुकसानीसाठी लोकप्रतिनिधी मात्र शेतक-याच्या बांधावर जात आहेत.   

इगतपुरी तालुक्यातील अतिवृष्टी व करपा किडीने झालेल्या भातपिकाची आमदार हिरामण खोसकर यांनी पाहणी केली. तीन ते चार दिवसांपासून या भागात पाऊस सुरू असून, त्यातून भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, भावली, पिंप्रीसदो, तळोघ, टाके, तळोशी, मानवेढे, कांचनगाव, काळुस्ते, भरवज शिवारात भातपिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करून नुकसानभरपाई मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन आमदार खोसकर यांनी दिले.

पाहणीदरम्यान त्यांच्याकडे शेतकरी अनिता घारे, यशवंत घारे, कैलास घारे, तानाजी घारे, लालू जागले, मल्हारी घारे यांनी व्यथा मांडल्या. कोरोना संकटात भातशेतीचे नुकसान झाल्याने अडचणी वाढल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खोसकर, जनार्दन माळी, रामदास धांडे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब वालझाडे, बाळासाहेब लंघडे, सतीश गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, रामदास गव्हाणे, अतुल माळी, नामदेव गव्हाणे, नितीन गव्हाने, भोरू गव्हाणे, भगवान घारे, संजय घारे, किसन घारे, यशवंत घारे, लालू जागले, बहिरू घारे, मल्हारी घारे, श्रावण घारे, वाघू घारे आदी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


फोटो फीचर