आमदार दिलीप बनकरांची वीज पुरवठ्यासाठी अभियंत्यांना तंबी!

निफाड तालुका म्हणजे महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया. द्राक्ष बागांची कामे सध्या सुरु आहेत. त्यात वीजपुरवठा खंडीत होऊन व्यत्यय येतो. त्यामुळे शेतक-यांच्या समस्यांची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी थेट वीज अभियंत्यांनाच गाठले. तालुक्यातील वीजपुरवठा चार दिवसांत सुरळीत करा, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, अशी तंबी दिली
आमदार दिलीप बनकरांची वीज पुरवठ्यासाठी अभियंत्यांना तंबी!

पिंपळगावं बसवंत : निफाड तालुका म्हणजे महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया. द्राक्ष बागांची कामे सध्या सुरु आहेत. त्यात वीजपुरवठा खंडीत होऊन व्यत्यय येतो. त्यामुळे शेतक-यांच्या समस्यांची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी थेट वीज अभियंत्यांनाच गाठले. तालुक्यातील वीजपुरवठा चार दिवसांत सुरळीत करा, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, अशी तंबी दिली. 

द्राक्षछाटणी, द्राक्ष बागेवर औषध फवारणीच्या काळात शेतक-यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे सहनशीलतेचा अंत झाल्याने शेतक-यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. येत्या चार दिवसात वीजेच्या तारा, रोहीत्र यांची तपासणी करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी सूचना यावेळी देण्यात आली. गेल्या पंधरा दिवसापासून पिंपळगांव शहर, रानमळा, बेंदमळा परिसरात वीजेचा लंपडाव सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी, नागरिक आक्रमक होत त्यांनी आज पिंळगांवच्या महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. आमदार बनकर यांनी त्याची दखल घेत महावितरण कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक आयोजित केली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, श्री. पगार, `मविप्र` संस्थेचे माजी संचालक विश्‍वास मोरे, दिलीप मोरे, बाळासाहेब बनकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी शेतक-यांनी अधिका-यांवर प्रश्‍नाची सरबत्ती केली. वीजपुरवठा कधीही खंडीत केला जातो, रात्र अंधारात काढावी लागते, शेतीच्या कामे ठप्प आहेत, असे एकापाठोपाठ एका प्रश्‍नाची सरबत्ती केली. तक्रारीसाठी दुरध्वनी क्रमांकावरून प्रतिसाद मिळत नाही. वीज वितरणचे कर्मचारी संपर्क करूनही रोहीत्रातील बिघाड दुरूस्तीसाठी येत नाही, अशा तक्रारीचा पाढा त्यांनी वाचला.

यावर आमदार दिलीप बनकर यांनी वीज कंपनीच्या अधिका-यांना कडक शब्दांत समज दिली. वीज रोहीत्र व ताराच्या पाहणीस तात्काळ सुरवात करा. तारा व रोहीत्र बदलण्याची आवश्‍यकता असेल, तीथे  तात्काळ कार्यवाही करा. येत्या चार दिवसात वीजेच्या तक्रारी दुर करा, अशा सूचना आमदार बनकर यांनी दिल्या. आमदार बनकर म्हणाले की, अतिदाबाच्या रोहीत्राचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. यासह मतदारसंघात मुबलक प्रमाणात वीज पुरवठ्यासाठी तीस कोटींचा प्रस्ताव ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविला आहे.
महावितरणच्या अधिका-यांनी येत्या शनिवारपर्यत वीज पुरवठा सुरळीत होईल असे आश्‍वासीत केले. स्व. बनकर पतसंस्थेत झालेल्या या बैठकीस संजय मोरे, रविद्र मोरे, गणेश बनकर, शाम मोरे, राजेद्र खोडे, सुनिल जाधव, जयराम मोरे, दिलीप दिघे आदी उपस्थित होते.

...आणि मोर्चा टळला 
खंडीत वीज पुरवठ्यावरून पिंपळगावंच्या शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी होती. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा शॉक देण्याची तयारी नागरिकांनी केली होती. हा मोर्चा निघाला असता, तर वीज मंडळाच्या प्रशासनासह पोलिसांचीही अडचण झाली असती. मात्र आमदार बनकर यांनी शेतकरी व वीज वितरण अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत मार्ग निघाल्याने मोर्चा टळला.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX-bP2I3&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=e8888a6d85f0a8a68aa0900535a3f8c0&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com