आमदार बनकर यांनी सुरु केला, सिन्नरचा ऑक्सिजन प्लांट !

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोव्हीड १९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, राज्यात नाशिक जिल्हा सर्वात जास्त बाधित असल्याचे आकडेवारीनुसार दिसते. त्यामुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. त्यावर उपाय म्हणून आमदार दिलीप बनकर यांनी पाठपुरावा करून सिन्नरचा बंद पडलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरु केला आहे.
Sinnaer Oxigen Plant
Sinnaer Oxigen Plant

नाशिक : जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोव्हीड १९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, राज्यात नाशिक जिल्हा सर्वात जास्त बाधित असल्याचे आकडेवारीनुसार दिसते. त्यामुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. त्यावर उपाय म्हणून आमदार दिलीप बनकर यांनी पाठपुरावा करून सिन्नरचा बंद पडलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरु केला आहे.  

जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णांना आरोग्य व्यवस्था अपूर्ण पडत आहे आणि त्यात ऑक्सिजनचा तुटवडा म्हणून अनेक रुग्णालयात रुग्णांना दुसरीकडे हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, कोव्हीड रुग्णांना ऑक्सिजन हा सर्वात महत्वाचा आहे आणि हिच बाब हेरून निफाडचे आमदार दिलीप  बनकर यांनी जिल्ह्याला ऑक्सिजन कुठून मिळवता येईल यासाठी प्रयत्न सूरु केले  होते. 

सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी मे. स्वस्तिक एयर प्लांट, २०१९ पासून वीजेचे देयक न भरल्याने बंद अवस्थेत होती. ही बाब आमदार बनकर यांना समजताच त्यांनी तात्काळ मुंबई गाठत   उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन ही ही समस्या मांडली, महत्वाचा विषय असल्याने दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर वीज जोडणी सुरळीत करण्यास सांगितले, आमदार बनकर मुंबईहुन नाशिकला पोहचले तोपर्यंत या  कंपनीचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा दूरध्वनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमदार बनकर यांना केला. त्यांनी श्री. तनपुरे यांनाच प्रकल्प सुरु करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. श्री. तनपुरे यांनीही ते मान्य केले. काल (ता.२८) सिन्नर येथे राजमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते स्वस्तिक एयरच्या ऑक्सिजन निर्मीतीचा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. स्वस्तिक एयर रोज ६०० ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन निर्माण करु शकते. यामुळे जिल्ह्यातील प्राणवायूचा तुटवडा भरून निघण्यास हातभार लागेल असा विश्वास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. केवळ वीज पुरवठा खंडीत असल्याने जर प्राण वायूची निर्मिती बंद असेल आणि कोव्हीड रूग्ण जर त्यामुळे दगावत असतील तर तुर्तास वीज वसुली बाबत अन्य बाबींचा अवलंब करता येऊ शकेल परंतु लोकांचा जीव वाचला पाहीजे ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यातून हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत झाला. ही बाब महत्वाची असल्याचे मत श्री. तनपुरे यांनी व्यक्त केले 

हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदार बनकर यांनी केलेला पाठपुरावा  खरोखरच वाखण्याजोगा असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री तनपुरे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष सहकार्य मिळाल्याबद्दल आमदार बनकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com