आमदार दिलीप बनकरांनी साखर कारखान्यासाठी बांधली नऊ नेत्यांची मुठ ! - MLA Dilip Bankar coordinate nine leaders for sugar factory of Niphad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

आमदार दिलीप बनकरांनी साखर कारखान्यासाठी बांधली नऊ नेत्यांची मुठ !

संपत देवगिरे
मंगळवार, 28 जुलै 2020

साखर कारखाना सुरु करणार, या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या अवघ़ड, अडचणीच्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आमदार दिलीप बनकर यांनी सोमवारी महत्वाचे राजकीय पाऊल टाकले. मतदारसंघातील नऊ प्रमुख नेत्यांना एका व्यासपिठावर आणले. 

नाशिक : साखर कारखाना सुरु करणार, या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या अवघ़ड, अडचणीच्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आमदार दिलीप बनकर यांनी सोमवारी महत्वाचे राजकीय पाऊल टाकले. मतदारसंघातील नऊ प्रमुख नेत्यांना एका व्यासपिठावर आणले. यावेळी आधी रानवड आणि त्यानंतर निफाड हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरु करण्याचा निर्णय झाला. यातुन जिल्ह्याच्या ऊसाच्या राजकारणाला एक नवे वळण मिळेल.

राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांसाठी कधीकाळी दीपस्तंभ असलेल्या या तालुक्यातील निफाड आणि रानवड हे दोन्ही साखर कारखाने बंद आहेत. निफाड कारखान्याचा सलग आठवा गळीत हंगाम बंद असल्याने आर्थिक अडचणींमुळे हे कारखाने सुरु करणे एक दिव्यच आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार बनकर व शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यातील राजकीय स्पर्धेत यापूर्वी ते शक्य झाले नव्हते. आमदार बनकर यांनी यंदाच्या निवडणुकीत हे कारखाने सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. ते प्रत्यक्षात आनण्यासाठी त्यांनी सोमवारी पिंपळगाव बाजार समितीत बैठक बोलावली. त्यात तब्बल नऊ नेत्यांना एका व्यासपीठावर आणले. या सगळ्यांची मुठ बांधली. त्यामुळे त्यांची ही राजकीय `मुव्ह` चर्चेचा विषय ठरली. 

या बैठकीत माजी मंत्री विनायकदादा पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, सभापती माणिकराव बोरस्ते, माजी आमदार अनिल कदम आणि नानासाहेब बोरस्ते, राजेंद्र मोगल उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनाही निमंत्रीत केले होते, मात्र ते अनुपस्थित राहिले.

निफाड कारखाना गेल्या आठ गळीत हंगामांपासून बंद आहे. त्यावर जिल्हा बॅंक, विक्रीकर (जीएसटी), भविष्य निर्वाह निधी, कामगारांचे पगार व देणी, शासकीय देणी असा मोठा आर्थिक भार आहे. मात्र ड्राय पोर्टसाठी या कारखान्याची जमिन विक्री करुन त्या पैशांतून देणी भागवून कारखाना सुरु करण्याचा पर्याय आहे. रानवड कारखाना सध्या राज्य सासनाकडे असून तो भाडेतत्वाने चालविण्यास देण्याची निविदा प्रक्रीया सुरु आहे. यासंद्रभात उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संचालकांकडे बैठक झाली आहे. 

निफाड तालुक्यात मोठ्या प्रामणात ऊसाचे उत्पादन होते. हा ऊस सध्या शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना जातो. त्यामुळे कारखाने सुरु झाल्यास ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न आला, की राजकारण आडवे येतेच. तालुक्यात गेली दहा वर्षे आजी, माजी आमदारांत  राजकीय ओढाताण सुरु होती. यावर भविष्यातही नेत्यांच्या अस्तित्वासाठी नसलेल्या राजकीय वादाला फोडणी मिळालीच असती. आमदार दिलीप बनकर यांनी निवनडणूक जाहिरनाम्यात कारखाना सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वच गटांना, विरोधकांना व पाठीराख्यांना एकत्र करुन त्यांनी हा राजकीय मास्टरस्ट्रोक मारला आहे. 
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख