ऑक्सिजन उपलब्धतेसाठी पंधरा लाखांचा निधी 

शहरात शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्या उपचारात प्रमुख घटक असलेल्या ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. यासंदर्भात शासनाच्या प्रयत्नांना आमदार देवयानी फरांदे यांनीही मदत केली असुन त्यांनी आमदार निधीतील पंधरा लाखांचा निधी दिला आहे.
Devyani Pharande
Devyani Pharande

नाशिक :

नाशिक : शहरात शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्या उपचारात प्रमुख घटक असलेल्या ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. यासंदर्भात शासनाच्या प्रयत्नांना आमदार देवयानी फरांदे यांनीही मदत केली असुन त्यांनी आमदार निधीतील पंधरा लाखांचा निधी दिला आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. ऑक्सिजन बेडसाठी खेटे घालावे लागत आहेत. रुग्णांना घरी जागा उपलब्ध असल्यास ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. यासाठी नागरिकांना नाममात्र ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेकडे केली आहे. यासाठी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून १५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहेत. 

शहरात दिवसाला हजारपटीने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. विविध ठिकाणी संपर्क करून बेड उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्या नागरिकांकडे जागा उपलब्ध आहे, अशा नागरिकांना ऑक्सिजन किट उपलब्ध करून दिल्यास घरच्या घरी उपचार मिळणे त्यांना शक्य होणार आहे. यासाठी आमदार फरांदे यांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना नागरिकांसाठी नाममात्र भाड्याने ऑक्सिजन किट उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडेदेखील केली आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com