आमदार चिमणराव पाटील यांच्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील हतबल! - MLA Chimanrao Patil using pressure tacties, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

आमदार चिमणराव पाटील यांच्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील हतबल!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

राज्यात माहाविकास आघाडी असल्याने शासकिय समित्यांत तिन्ही पक्षांना स्थान द्यावे, असे आदेश आहेत. परंतु आमदार चिमणराव पाटील एरंडोल- पारोळा मतदारसंघात हा नियम पाळत नाहीत.   त्यांच्यामुळेच आपण काम करण्यास हतबल झालोत, अशी व्यथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती.  आमदार पाटील हेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर दबाव आणतात अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीष पाटील यांनी दिली.

जळगाव : राज्यात माहाविकास आघाडी असल्याने शासकिय समित्यांत तिन्ही पक्षांना स्थान द्यावे, असे आदेश आहेत. (All three political parties shall get representtion in Government committees) परंतु आमदार चिमणराव पाटील एरंडोल- पारोळा मतदारसंघात हा नियम पाळत नाहीत. (Shivsena MLA Chimanrao patil not follow that principle)   त्यांच्यामुळेच आपण काम करण्यास हतबल झालोत, अशी व्यथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती.  आमदार पाटील हेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर दबाव आणतात अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीष पाटील )Dr. Satish Patil) यांनी दिली.

शिवसेनेचे पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांनी  शिवसेनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आपणास त्रास देत  असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही शिवसेना नेत्यांतील वादात राष्ट्रवादीच्या डॅा पाटील यांनी उडी घेतल्याने या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.  

पालकमंत्री पाटील यांनी या बाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या वादात एरंडोल पारोळा मतदार संघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाधयक्ष डॉ.सतीष पाटील यांनी उडी घेतली. त्यांनी पालकमंत्री आघाडी धर्म पाळतात मात्र चिमणराव पाटील पाळत नाहीत, असा  आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले की,  शासकीय समित्यांच्या सदस्य नियुक्ती राज्यात सध्या  ६०:२०:२० असा फॉर्म्युला तिन्ही पक्षांचा ठरला होता. ज्या तालुक्यात ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाच्या सदस्यांना ६० टक्के तर उर्वरित दोन पक्ष्यांना प्रत्येकी वीस टक्के प्रतिनिधीत्व द्यावे असे ठरले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही त्यांच्या तसेच इतर सर्व आमदारांच्या मतदारसंघात हा फॉर्म्युला वापरला. मात्र आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल- पारोळा मतदारसंघात हा फॉर्म्युला वापरला नाही. त्यांनी आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांना विरोध करीत एरंडोल- पारोळा येथे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा एकही सदस्य नियुक्त केला नाही.  याबाबत आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, आमच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यामुळे मी काम करण्यास हतबल झालो आहे.

शिवसेनेच्या पालकमंत्र्यावर दबाव आणून आमदार चिमणराव पाटील काम करून घेत असल्याचे दिसत आहे. पुन्हा तेच म्हणतात, आपल्याला शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य बालिशपणचे आहे.

शिवसेनेच्या अंतर्गत वादात आपल्याला बोलायचे नाही. मात्र एरंडोल- पारोळा मतदारसंघात आमदार चिमणराव पाटील यांनी पालक मंत्र्यावर दबाव आणून काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला. त्यामुळे आपल्याला बोलावे लागले. याबाबत आपण अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या नियुक्तीबाबत पत्र दिलं दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार चिमणराव पाटील यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पेक्षा चार वेळा निवडून आलेले गुलाबराव पाटील यांना पक्षाने मंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे त्यांचे दुःख आहे. याशिवाय त्यांची आता भारतीय जनता पक्षात जाण्याची तयारी असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी हे आरोप केल्याचे दिसते, असा आरोप डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.
...

हेही वाचा...

राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे?
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख