आमदाराने पाठलाग करून पकडला अवैध गुटख्याचा ट्रक.. - MLA chases and seizes illegal gutkha truck  | Politics Marathi News - Sarkarnama

आमदाराने पाठलाग करून पकडला अवैध गुटख्याचा ट्रक..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा आर्शीवाद असल्याने त्यांच्यावर कारवाई पोलिस करीत नाही, असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.  

चाळीसगाव : मेहुणबारे (ता. चाळीसगाव) हद्दीत गुटखा असलेला ट्रक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पकडला..पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. यावरून बेकायदा व्यावसायिक आणि वरिष्ठ अधिकारी यांचे हितसंबध कसे आहेत, हे स्पष्ट होते.  या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. चाळीसगावमधून गुटखा, गांजा राज्यात पुरविला जातो. अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा आर्शीवाद असल्याने त्यांच्यावर कारवाई पोलिस करीत नाही, असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.  

याबाबत पत्रकारांना माहिती देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार केली. पण माझी तक्रार पोलिसांनी घेतली नाही. याबाबत उच्च न्यायालयात मी दाद मागणार आहे. मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पन्नास लाखाचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक (एमएच १८-एम ०५५३) पकडला. वरिष्टांच्या आदेशानुसार हा ट्रक जळगाव येथे आणत मी त्याचा पाठलाग करून हा ट्रक शिरसोली येथील जैन व्हॅली येथे पहाटे चार वाजता  पकडला. या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी.  

संबंधित लेख