आमदार अनिल पाटील यांच्या बनावट फेसबुकद्वारे पैशांची मागणी 

येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट सुरू करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला. अकाउंट बनविणाऱ्याने याच नावाशी साधर्म्य व सारखेच वाटणारे ‘भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील’ या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार केले.
आमदार अनिल पाटील यांच्या बनावट फेसबुकद्वारे पैशांची मागणी 
Anil Bhaidas Patil

अमळनेर : येथील आमदार अनिल भाईदास पाटील (MLA Anil Bhaidas Patil) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook account) सुरू करून पैशांची मागणी (Deemand money) केल्याचा प्रकार समोर आला. अकाउंट बनविणाऱ्याने याच नावाशी साधर्म्य व सारखेच वाटणारे ‘भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील’ या नावाने सोशल मीडियावर (Social media account) अकाउंट तयार केले. त्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

या अकाउंटच्या माध्यमातून तालुक्यातील भरवस, शिरूड व शिरसाळे इतर गावातील कार्यकर्त्यांना पैशांची मागणी करणारे संदेश पाठवले गेले. त्यात मला २० हजार लागणार असून, ‘फोन पे’ने पाठवून द्या’, असे संदेश पाठविले होते. कार्यकर्ते सजग असल्याने त्यांनी तत्काळ आमदारांना ही बाब सांगितली. 
घटनेचे गांभीर्य ओळखून सोशल मीडिया हाताळणारे गणेश भामरे यांच्यासह त्यांच्या सोशल मीडियाच्या टीमने फेसबुकशी संपर्क साधून व तांत्रिक बाबींची पूर्तता करून काही तासांच्या आत बनावट अकाउंट बंद केले. तोवर आमदारांचे स्वीय सहाय्यक सचिन बेहरे यांनीही बाब पोलिस निरीक्षकांना सांगितली. अखेर बनावट फेसबुक अकाउंट बंद झाल्यानंतर आमदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

...
योग्य त्या सूचना दिल्यानंतर बनावट फेसबुक अकाउंट बंद केले आहे. मात्र, नागरिकांनीही हॅकर्सच्या मागणीला बळी न पडता व घाबरून न जाता पोलिस दलाशी संपर्क साधावा. 
- अनिल पाटील, आमदार, अमळनेर  
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in