मराठा आरक्षणाला महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा विरोध..

तीन पक्षाचे सरकार असल्याने वाद विवाद आहे, मतभिन्नता आहे.
14Sarkarnama_20Banner_20_2864_29_3 - Copy.jpg
14Sarkarnama_20Banner_20_2864_29_3 - Copy.jpg

जळगाव  :  "राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला Maratha reservation विरोध असल्यानेच आरक्षण गेले आहे," असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन Girish Mahajanयांनी केली आहे.  ministers in Thackeray government oppose Maratha reservation bjp mla Girish Mahajan

छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाबाबत जाहीर केलेल्या भूमिकेबाबत ते बोलत होते.  ते म्हणाले की, ज्या वेळी राज्यात आमचे भाजपचे सरकार होते त्यावेळी आम्ही सर्व तांत्रिक बाबी तपासून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात ही टिकले, दुर्दैवाने आमचे सरकार गेले आणि आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडू शकले नाहीत, त्यामुळे आरक्षण गेले, त्यामुळे त्याला भाजप सरकार जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु आघाडी सरकार आणि वकील आपली बाजू मांडण्यास कमी पडले तसेच तीन पक्षाचे सरकार असल्याने वाद विवाद आहे, मतभिन्नता आहे. 

मंत्रिमंडळातील  अर्धे मंत्री या आरक्षणाच्या विरोधात आहेत, ते आरक्षण देऊ नका, असे म्हणत आहेत. त्या मुळेच आरक्षण गेले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाबाबत महाजन म्हणाले, की संभाजी राजे आमच्याच पक्षाचे आहेत, त्यांना सर्व कल्पना आहे, सर्व माहिती आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात बघू या, असे महाजन म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गरजूंना धान्य किट वाटप तसेच विविध कार्यक्रम भाजपतर्फे आयोजित करण्यात आले आहेत.

संभाजीराजे- आंबेडकरांच्या भेटीकडं राज्याचं लक्ष..पुण्यात आज शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार? 
 
पुणे :  "बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवीन राजकीय पक्षाचा विचार केला जाईल," असे विधान खासदार संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पक्ष येणार, या चर्चेला उधाण आले आहे. संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष काढावा म्हणून आता सोशल मीडियातून चळवळ सुरू झाली आहे. आज ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहेत. त्यांच्या या भेटीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या भेटीतनंतर संभाजीराजे नवा पक्ष काढतील का..शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का, अशा  प्रश्नांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.   

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com