जयंत पाटील हरवले इगतपुरीच्या धबधबे अन् धरणांच्या बॅकवॅाटरमध्ये

महाबळेश्वरनंतर राज्यातील सर्वाधीक पाऊस इगतपुरीला होतो. सह्याद्रीच्या शिखरावरून कोसळणारे धबधबे आणि जाल तिकडे धरणांचे बॅकवॅाटर यात रमणार नाही असा माणुस शोधुनही सापडणार नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील हे दृष्य पाहून हरखून अन् हरवून गेले.
जयंत पाटील हरवले इगतपुरीच्या धबधबे अन् धरणांच्या बॅकवॅाटरमध्ये

नाशिक : महाबळेश्वरनंतर राज्यातील सर्वाधिक पाऊस इगतपुरीला होतो. त्यामुळे सध्याच्या हंगामात इथे पावलोपावली बहरलेली हिरवीगार भातशेती, सह्याद्रीच्या शिखरावरून कोसळणारे धबधबे आणि जाल तिकडे धरणांचे बॅकवॅाटर असे मनोहारी दृष्य असते. यात रमणार नाही असा माणुस शोधुनही सापडणार नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील हे दृष्य पाहून हरखून अन् हरवून गेले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे सतत मागणी करणारे, हार-तुरे देऊन स्वागत करणारे यांच्याच गराड्यात त्यांना वावरावे लागते. यातून सुटलेच तर मंत्री म्हणून अधिका-यांचा गराडा पडतो. यातून उसंत नसते. मात्र शनिवारी त्यांनाया सगळ्यांचाच विसर पडला. निमित्त ठरले, महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या इगतपुरीचा दौरा. येथील वैतरणा, भावली व या दरम्यान लागलेल्या विविध नद्या, खळखळणारे ओढे, भाताच्या आवनातील (खाचरांत) अडलेले पाणी, त्यातून जमिन दिसलीच तर धरणांचे बॅकवॅाटर. महाराष्ट्रीतल सर्वात उंच शीखर कळसूबाईचा हा परिसर. पावसाळ्यात तर इथे निसर्ग अवचित स्वर्ग निर्माण करतो. त्यामुळे इथे गेले अन् भान विसरून त्यात हरवले नाही असे शक्य नव्हते. जलसंपदामंत्री जयंत पाटील देखील त्यात हरवले अन् रमले. त्यांनी मस्त अर्धा दिवस येथे घालवला.   

यावेळी ते म्हणाले,  भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. बोटिंगसह इतर सुविधांतील गुंतवणुकीतून हा परिसर प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. पर्यटकांना आकर्षित करणारे सौंदर्य या भागात असल्याने लवकरच आवश्यक त्या योजना राबविण्यासाठी नियोजन करणार आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात भावली धरण वसलेले असून, अनेक पर्यटक सुटीच्या दिवशी इथे भेट देतात. त्याअनुषंगाने या धरण भागात पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल. इगतपुरी येथे बरीच प्रेक्षणीय स्थळेही यानिमित्ताने विकसित होतील. नैसर्गिक धबधब्यांचे चांगले सुशोभिकरणही करता येऊ शकते.

खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, संदीप गुळवे, गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, कमलाकर नाठे, रामदास धांडे, अरुण गायकर, प्रशांत कडू, अर्जुन टिळे, ज्ञानेश्वर कडू, महिला तालुकाध्यक्ष अनिता घारे, प्रवीण ठाकरे, समीर साबळे, गोकुळ थेटे, जगन कदम, पोपट भागडे, अनिल रुमारे, धनंजय पोरजे, नंदू कड्ड, योगेश भागडे, शरीफ शेख, अनिल भागडे, गोरख भागडे, सागर भोर, मदन कडू, भास्कर भागडे, इमरान शेख, कैलास वाघचौरे, चंद्रकांत कदम उपस्थित होते. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=jIkjkeB_H1IAX8y0Roy&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=13f08519edd5a57a710e523cab9fe06f&oe=5F40CCA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com