शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं भाजपला महागात पडेल; गुलाबराव पाटील यांची टीका - Minister Gulabrao Patil slams BJP over Farmer Protest | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं भाजपला महागात पडेल; गुलाबराव पाटील यांची टीका

कैलास शिंदे
मंगळवार, 26 जानेवारी 2021

नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाला आता व्यापक स्वरूप आले आहे.

जळगाव : नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाला आता व्यापक स्वरूप आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं भाजपला महागात पडेल, असा टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

दिल्लीमध्ये आज शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिसंक वळण लागले. यामुळे दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावरून शेतकरी आंदोलनावर काही जणांकडून टीका केली जात आहे. याअनुषंगाने बोलताना पाटील म्हणाले, दिल्लीत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे. परंतु केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं हे आंदोलन आता देशात पसरत आहे.

आता आदिवासी शेतकरीही आंदोलनात उतरला आहे. त्यामळे हे आंदोलन एक व्यापक झाले आहे. मात्र केंद्रातले भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना ते महागात पडेल, असे पाटील म्हणाले. राज्याचे राज्यपालांनी शेतकऱ्यांना भेट न दिल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान,  पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकल्याचे आढळून आले. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. 

दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. याचदरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकल्याचे आढळून आले. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर काही शेतकऱ्यांनी पोलिसांना दोषी धरत त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख