गुलाबराव पाटील म्हणाले, ‘कोरोनापासून मुक्ती मिळू दे’

श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथून भीमातीरावरील विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीस महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान सोमवारी सकाळी अकराला जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे करण्यात आले.
Muktai palkhi
Muktai palkhi

मुक्ताईनगर : तापीतीरावरील श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर (Sent Muktai palkhi proceed towards Pandharpur)  येथून भीमातीरावरील विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीस महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मानाच्या दहा पालख्यांपैकी (It is first in Ten palkhis approved by state govt.) प्रथम निघणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान सोमवारी सकाळी अकराला जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

गेल्या ३१२ वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची परंपरा असून, मध्य प्रदेश, खानदेश, विदर्भातील भाविक दिंड्यांसह या सोहळ्यात सहभागी होत असतात. सुमारे ७०० किलोमीटरचे अंतर ३३ दिवसांत ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता पिढ्यान्पिढ्या वारी सुरू आहे. मात्र, मागील वर्षांपासून या वारीला कोरोनाची दृष्ट लागली असून, शासनाकडून जनतेच्या हितासाठी निर्बंध घातल्याने वारी पायी न जाता बसने होत आहे.

या वर्षींही कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे शासनाने वारकऱ्यांचे प्रमाणभूत संतांचे दहा मानाच्या पालख्यांना मान्यता दिलेली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश असून, या पालखीचे परंपरेनुसार सोमवारी जुन्या मुक्ताबाई मंदिरात सकाळी अकराला मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, पालखी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, तहसीलदार श्वेता संचेती, पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, नरेंद्र नारखेडे यांची उपस्थिती होती.

पालखीचा मुक्काम मंदिरातच
पालखी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम नवीन मुक्ताबाई मंदिरात आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील.

पालकमंत्री मुक्ताईचरणी

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताई मंदिर परिसरातील सुरू असलेल्या कामांची माहिती सांगत उर्वरित निधी मिळवून द्यावा, असे पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी केली. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताई मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांसाठी ग्रामविकास, पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करून निधी मिळवून देणार असल्याचे सांगितले. ‘कोरोनापासून मुक्ती मिळू दे’, असे मुक्ताईचरणी दर्शनानंतर साकडे घातले.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com