`एमआयएम`चे आमदार मौलाना म्हणतात, `माझ्या जीवाला धोका`

मालेगाव येथील माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. त्यावरून काँग्रेस आणि `एमआयएम`च्या नेत्यांतील आरोप-प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. काल यासंदर्भात आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन माझ्या जीवाला धोका. गुन्हेगारांना पकडा व कारवाई करा, अशी विनंती केली.
`एमआयएम`चे आमदार मौलाना म्हणतात, `माझ्या जीवाला धोका`
Maulana Mufti

नाशिक : मालेगाव (Malegaon) येथील माजी नगरसेवक रिजवान खान (Rizwan Khan) यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. (Firing on Rizwan khan`s) त्यावरून काँग्रेस आणि `एमआयएम`च्या (Majlis-e-ittehadul muslimeen) नेत्यांतील आरोप-प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. (Political blaimings On each others) काल यासंदर्भात आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन माझ्या जीवाला धोका. गुन्हेगारांना पकडा व कारवाई करा, अशी विनंती केली. 

माजी नगरसेवक खान यांच्या घरावर गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर रिजवान खान यांनी यामध्ये आपल्या राजकीय विरोधकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करीत काँग्रेसच्या नेत्यांकडे अंगुलीनिर्देश केला होता. तेव्हापासून या प्रकरणावर सुरु झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. 

गेल्या आठवड्यात यासंदर्भात काँग्रेसचे नेते, माजी आमदार रशीद शेख यांनी याबाबत तक्रार करणाऱ्यांवर चागंलेच तोडंसुख घेतले होते. हल्लेखोर गोळाबार करायला गेले होते, तेव्हा ते कोणाला विचूरन गेले होते का?. तसे झाले असते तर चित्र काही वेगळेच असते. या विषयावर जाणीवपूर्वक राजकीय वातावरण तापविले जाते आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोळीबाराचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

याप्रकरणी `एमआयएम`च्या नेत्यांनी काल अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेतली. यावेळी  रिजवान खान, डॅा खालीद परवेझ, मुश्तकीम डिग्नीटी आदींसह `एमआयएम`चे आमदार मौलाना मुफ्ती होते. यावेळी आमदार मुफ्ती यांनी गोळीबार झाल्यानंतर पोलिसांगी गांभिर्याने तपास करण्याची गरज आहे. या प्रकरणात लक्ष घालून त्याचा निष्पक्ष तपास करावा. कारण त्यातून आमच्या नेत्यांच्या जीवाला धोका आहे, हे स्पष्ट होते. अगदी माझ्या जिवितास देखील धोका आहे. त्यामुळे त्यात तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली.  
....
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in