एमआयएम म्हणते, `लॉकडाउन की मार, गरिबों पर अत्याचार' - MIM Agitation against corona lockdown, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

एमआयएम म्हणते, `लॉकडाउन की मार, गरिबों पर अत्याचार'

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

‘लॉकडाउन की मार गरिबों पर अत्याचार’, मजदुरों पर अत्याचार, ‘नही चलेगा नही चलेंगा-लॉकडाउन नही चलेगा’, ‘जिओ और जिने दो’, ‘लॉकडाउन हटाना है-मजदूरों को बचाना है’ यांसह विविध घोषणा देत एमआयएम तर्फे आज मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे अंशत: लॉकडाउन व ब्रेक दी चेन आदेशातील निर्बंधांचा विरोध करण्यात आला. 

मालेगाव : ‘लॉकडाउन की मार गरिबों पर अत्याचार’, मजदुरों पर अत्याचार, ‘नही चलेगा नही चलेंगा-लॉकडाउन नही चलेगा’, ‘जिओ और जिने दो’, ‘लॉकडाउन हटाना है-मजदूरों को बचाना है’ यांसह विविध घोषणा देत एमआयएम तर्फे आज मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे अंशत: लॉकडाउन व ब्रेक दी चेन आदेशातील निर्बंधांचा विरोध करण्यात आला. एमआयएमचे मनपा गटनेते डॉ. खालीद परवेज, हाफीज अब्दुल्ला इस्माईल यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नव्याने काढलेल्या आदेशातील निर्बंधांविरोधात येथील राजकीय पक्ष व व्यापारी आक्रमक झाले आहेत. बुधवारी कॉंग्रेस, जनता दलाने धरणे आंदोलन, जेल भरो आंदोलन व मोर्चा काढल्यानंतर एमआयएमने मोर्चा काढला. मोर्चा काढणाऱ्या डॉ. खालीद परवेज यांच्यासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलनकर्त्या ५० कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी अटक करून काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. शहरातील किदवाई रस्त्यावरील शाळा क्रमांक १, जुना टांगा स्टँडपासून मोर्चाला सुरवात झाली. किदवाई रोडवरून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आला. तेथे मोर्चा अडविण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना निवेदन दिले. मोर्चात नगरसेवक अय्याज हलचल, साजीद रशीद, मुजम्मील बफाती, राशीद अय्यूब, समीर खान, इब्राहीम शेख, इब्राहीम गबू खान आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

निवेदनात रमजान महिन्याची सुरवात हात असल्याने या कालावधीतील व्यवसायावरच कटपीस सेंटर, रेडिमेड, चप्पल दुकाने, टेलर्स, होजिअरी व लहान मोठ्या व्यावसायिकांचा चरितार्थ अवलंबून आहे. नियम कठोर करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. गेल्या वर्षीही रमजानकाळातच कोरोनाचा उद्रेक झाल्याने व्यवसाय संकटात सापडले आहेत. शहरात अन्य व्यवसायांना संधी नाही. यामुळे नियम शिथील करून सामाजिक अंतराचे पालन करीत व्यवसायाला परवानगी द्यावी. अन्यथा शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख