विद्यार्थ्यांसाठी कोविड सुरक्षा कवच योजना सुरु केली  - MHSU University starts COVID-19 cover plan | Politics Marathi News - Sarkarnama

विद्यार्थ्यांसाठी कोविड सुरक्षा कवच योजना सुरु केली 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोविड-19 परिस्थितीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. परिक्षेचा निर्णय घेताना विद्यापीठाने कोविड सुरक्षा कवच योजना सुरु केली, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. 

नाशिक : कोविड-19 परिस्थितीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. परिक्षेचा निर्णय घेताना विद्यापीठाने कोविड सुरक्षा कवच योजना सुरु केली, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. 

ते म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीत निर्णय घेतांना यशाच्या दिशेने वाटचाल करत राहणे गरजेचे आहे. वैद्यकीय शाखेबरोबर आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, सिध्द आदी विद्याशाखांनी एकत्र येऊन महत्वपूर्ण लढा दिला. समाजाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वानी प्रयत्न केले 

श्री. देशमुख म्हणाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाचे कार्य करावे. कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत भेडसावणारे समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने तांत्रिक मनुष्यबळाकरीता नवनवीन अभ्यासक्रम सुरु करीत आहे. विद्यापीठ परिसरात नवीन महाविद्यालय सुरु करण्याची गरज असून त्यासाठी आवश्‍यक मदत तसेच निधी देण्यात येईल असे सांगितले. 

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याची अंमलबजावणी करतांना प्रत्येक परीक्षार्थींस कोविड कवच देण्याचा देखील निर्णय घेतला, असे देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, यासंदर्भात राज्यपालांच्या सूचनांची पूर्ण अंमलबजावणी केली. त्याचा सर्वांनाच फायदा झाला. विद्यापीठाने दिलेल्या प्रस्तांवाना राज्य शासनाकडून आवश्‍यक पावले टाकू. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयांवर चर्चा घडवून येत्या पंधरा दिवसात या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल. कोरोना रोखण्यासाठी आपल्या पुरातन पॅथी गुणकारक असल्याचं सिद्ध झाले आहे. पाच हजार वर्षांच्या पुरातन आयुर्वेदात देखील संशोधन केले जाईल. त्या दृष्टीने सर्व आरोग्य पॅथीमध्ये संशोधन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन, विद्यापीठात पुस्तकी नाही, तर प्रायोगिक संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात यावा. 

यावेळी विधान परिषदेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, पालकमंत्री छगन भुजबळ, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख