निसर्ग सौंदर्य अबाधित ठेऊन पर्यटन विकास करा ! - mentain nature with Tourism Devolopments | Politics Marathi News - Sarkarnama

निसर्ग सौंदर्य अबाधित ठेऊन पर्यटन विकास करा !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पर्यटन वाढीची गरज आहे. मात्र ते करतांना विकासाच्या हव्यासापोटी आपलं पर्यावरण नष्ट करता कामा नये. त्या स्थितीत पर्यटनाचा विकास करण्याची आवश्‍यकता आहे, आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना असावी.

नाशिक : पर्यटन वाढीची गरज आहे. मात्र ते करतांना विकासाच्या हव्यासापोटी आपलं पर्यावरण नष्ट करता कामा नये. त्या स्थितीत पर्यटनाचा विकास करण्याची आवश्‍यकता आहे, आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना असावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन डेटा बॅंकेचे विमोचन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक व खारघर येथील दोन पर्यटक संकुलांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नाशिकला 2013 मध्ये छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काढलेली डेटा पुस्तिका हे राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिने एक महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राला अनेक गडकिल्यांचा वारसा लाभला आहे. त्याची जपवणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नाशिक बोट क्‍लबचा पूर्ण क्षमतेने विकास व्हावा आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. वन्य प्राणी, सूक्ष्मजीव हा आपल्या राज्याचा ठेवा आहे. ते मोठे वैभव आहे, त्याची जपणूक करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. हेच आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे खरे औचित्य ठरेल. 

ते म्हणाले, मुंबईतील गिल्बर्ट हिलवर बाराव्या शतकातील मंदिर आहे. या टेकडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ती ज्या खडकापासून बनली आहे, तशा खडकातल्या जगात केवळ दोनच टेकड्या आहेत. एक मुंबईतील अंधेरीच्या बाजूची आणि दुसरी अमेरिकेत. दोघांचा दगड एक आहे. अमेरिकेने त्या टेकडीची जपणूक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे. आपला देखील अशा ठेव्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने पर्यटन विभागाकडून रायगड विकासासाठी सहाशे कोटीचा निधी मंजूर केला. त्यातील वीस कोटींचा निधी वितरीत झाला आहे. गेल्या काही दिवसात या खात्याने चांगले काम केले आहे. पर्यटनाचा विकास करतांना राहण्याची खाण्याची, पोहोचण्याची उत्तम, सोय असायला हवी. यासाठी पर्यटनाचे एक स्वतंत्र पॅकेज करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. 

यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीपराव बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण शाखा अभियंता महेश बागुल, सागर शिंदे आदी प्रत्यक्ष व दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 
... 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख