महापौर सतीश कुलकर्णी राबविणार `नमामि गोदावरी`  - Mayor satish Kulkarni said Anti polluation drive for godawari, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

महापौर सतीश कुलकर्णी राबविणार `नमामि गोदावरी` 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, शाश्‍वत व पर्यावरणपूरक विकासासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदावरी उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी देण्याबरोबरच नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याबरोबरच महापालिकेतील रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.

नाशिक : शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, (BJP bonded for Nashik city devolopment) शाश्‍वत व पर्यावरणपूरक विकासासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदावरी उपक्रम राबविला जाणार आहे. (Now anti polluation drive for Godawari) त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी देण्याबरोबरच नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याबरोबरच महापालिकेतील रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी केली. 

महाकवी कालिदास कलामंदिरात शहर बससेवेच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी यौगिक क्रिया जलनेती अभियान पुस्तिकेचे प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना महापौर कुलकर्णी यांनी ही मागणी केली. ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमातून नगरसेवक, नागरिकांच्या समस्या सोडविल्या, पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात अठरा जलकुंभांची उभारणी, एलईडी बसविणे, २६० कोटींचे रस्ते तयार करणे, कोरोनाकाळात अकराशे बेडचे रुग्णालय उभारणे, पंधरा रुग्णवाहिकांची खरेदी करणे आदी कामांची माहिती दिली. महापालिकेत साडेतीन हजार रिक्त पदे असल्याने त्याचा कामावर ताण येतो. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.

महापालिकेतर्फे ‘बीओटी’ तत्त्वावर भूखंडांचा विकास केला जाणार असून, त्याद्वारे शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न प्राप्त होणार असल्याचा दावा त्यांनी केला. गोदातीरावर धार्मिक विधीसाठी शेड उभारले जाणार असून, नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी शासनाने मदत करण्याचे आवाहन केले. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नमामि गंगा उपक्रमाच्या धर्तीवर नमामि गोदावरी उपक्रम राबविला जाणार असून, या माध्यमातून गोदावरीचे प्रदूषण दूर करणे, पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

...
शहर विकासासाठी आयटी पार्क उभारण्याबरोबरच रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने मदत करावी, त्याचबरोबर गोदावरी स्वच्छतेसाठी निधी द्यावा, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ‘बीओटी’ तत्त्वावर मोकळ्या भूखंडांचा विकास केला जाणार आहे. 
- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक 
...
हेही वाचा...

भुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसका?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख