महापौर म्हणाले, परसेवेतील अधिकाऱ्यांमुळे कामात अडथळे

महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये कामकाजावरून जुंपली असतानाच आता महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला धारेवर धरत कामकाजात उणीवा समोर आणल्या आहेत.
Satish Kulkarni
Satish Kulkarni

नाशिक : महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये कामकाजावरून जुंपली ( Disputes between Mayor & Administration) असतानाच आता महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish kulkarni) यांनी प्रशासनाला धारेवर धरत कामकाजात उणीवा समोर आणल्या (Mayor keep finger on Administration`s lacks in day to day working)  आहेत. विभागप्रमुखांच्या मनमानी कारभारामुळे नियमित कामकाजात व्यत्यय येत असल्याने त्याचा परिणाम नगरसेवकांच्या विकासकामांवर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कामकाजात सुधारणा करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

महापौर कुलकर्णी यांनी सोमवारी प्रशासकीय कामकाजावर टीका केली. अर्थात, प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त कैलास जाधव अप्रत्यक्ष टीकेच्या अग्रस्थानी आहेत. महापौर कुलकर्णी यांनी गेल्या महिन्यात वार्षिक अंदाजपत्रक प्रशासनाला सादर केले. त्यात स्थायी समितीचे अंदाजपत्रकाचीच अंमलबजावणी होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्टीकरण दिल्याने वादाची ठिणगी पडली. 

या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी प्रशासकीय कामकाजाच्या त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले, की नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे यांच्याकडून प्रलंबित फायलींवर निर्णय घेतला जात नाही. एनएमआरडीएसह महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे असल्याने आठवड्यापैकी दोन दिवस ते कामकाज करीत असल्याने महसूल बुडत आहे. विरोधी पक्षासह महापौर या नात्याने राज्य शासनाच्या ही बाब निदर्शनास आणून देऊनही दखल घेतली जात नाही. 

प्रशासनाने मनुष्यबळाच्या कमतरता भरून काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा न केल्याने महसुलावर परिणाम झाला आहे. डीपी रस्त्यांचा विकास न झाल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडाले. यास प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. दादासाहेब फाळके यांच्या पुतळा उभारणे गरजेचे असताना, त्याकडे दुर्लक्ष होणे ही खेदाची बाब आहे. महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना चुकीची माहिती दिल्याने कर्ज काढण्याचा विषय अनिर्णित राहिला. 

स्मार्ट सिटीचा निधी मिळावा 
क्रिसिल संस्थेने ३०० कोटींची कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनीकडे अडीचशे कोटी रुपयांची अनामत रकक्म बॅंकेत जमा आहे. यात महापालिकेचे दोनशे कोटी रुपये आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यातील शंभर कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग होणे गरजेचे आहे. 

महापौरांचा हल्लाबोल 
ते म्हणाले, परसेवेतील अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्कर दप्तर दिरंगाई होत आहे. मनुष्यबळ वाढविले जात नसल्याने घरपट्टी, पाणीपट्टी महसुलावर परिणाम झाला आहे. परसेवेतील काही अधिकाऱ्यांचे महापालिकेत पर्यटन सुरु आहे. पदोन्नतीच्या प्रश्‍नात तीन वर्षांपासून चालढकल केली जात आहे. रिक्त पदांची भरती न होण्यास अधिकारी कारणीभूत आहे. विशेषतः वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. कोविड काळात भरती केलेले कर्मचारी वेतनविना असून परसेवेतील अधिकारी सोयीने फाइल फिरवितात.
....

अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून विकास शक्य आहे. प्रथम नागरिक म्हणून माझे त्यासाठी प्रयत्न आहेत. मात्र, प्रशासनाकडून सकारात्मक व क्रियाशिल कामकाजाची अपेक्षा आहे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com